संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

तीन अभियंत्यांना कोरोना, पाणीपुरवठ्याचा पुन्हा `रोना`

माधव इतबारे

औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी काम करणारेच बाधित होत आहेत. महापालिकेच्या अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला. त्यात पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या तीन अभियंत्यांना बाधा झाल्याचे मंगळवारी (ता. २१) समोर आले आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वीसवर अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागण
महापालिकेच्या कोरोनाबाधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वीसच्या घरात आहे. यातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन पुन्हा कामावर परतले आहेत. असे असतानाच आता पाणीपुरवठा विभागाच्या तीन कनिष्ठ अभियंत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यातील एकूण अभियंता कंत्राटी पद्धतीने काम करतो. एकाच दिवशी तीन अभियंत्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडून पडू नये, यासाठी आता कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंत्यांना प्रत्यक्ष लक्ष घालून काम करावे लागत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अँटीजेन चाचणीतून १९० नागरिक पॉझिटिव्ह 
महापालिकेने मंगळवारी (ता.२१) शहरात अँटीजेन व आरटीपीसीआर पद्धतीने ६,०९५ जणांची तपासणी केली. त्यात १९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 
दिवसभरात नगरनाका, नक्षत्रवाडी, झाल्टा फाटा, केम्ब्रिज स्कूल, हर्सूल, दौलताबाद टी-पॉइंट या सहा ठिकाणी १,१०६ अँटीजेन पद्धतीने चाचण्या करण्यात आल्या. ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. ‘स्वॅब कलेक्शन आपल्या दारी’ या मोहिमेत नऊ प्रभागांमध्ये १५ ठिकाणी शिबिर घेण्यात आले. त्यात ४,८१८ जणांची तपासणी झाली. त्यापैकी १४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

१०७ विक्रेत्यांचा समावेश 
दिवसभरात १९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १०७ व्यापाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांत २९१ व्यापारी-विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे त्यांची संख्या आता ३९८ वर गेली आहे. 

संपादन : प्रवीण मुके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

SCROLL FOR NEXT