Aparna Thete 
छत्रपती संभाजीनगर

coronavirus : या आहेत औरंगाबादमधील कोरोना योद्धा, असे चालते काम 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज नवनवीन भागात रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याचे काम आरोग्य विभाग करत असला तरी रुग्णांची साखळी शोधून ती थांबविण्याचे काम मात्र टास्क फोर्स करत आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून आत्तापर्यंत अॅड. अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली १२२४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले तर विविध भागात जाऊन ९५० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार महापालिकेमार्फत उपाय-योजना केल्या जात आहेत. सुरवातीस शहराच्या ठरावीक भागातच कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने महापालिका बिनधास्त होती. मात्र त्यानंतर मुंबई, पुणे येथून आलेल्या नागरिकांमुळे शहरात झपाट्याने लागण सुरू झाली. रुग्ण संख्या वाढताच प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी टास्क फोर्सची स्थापना केली. विधीसल्लागार ॲड. अपर्णा थेटे यांच्याकडे फोर्सच्या प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. रुग्णांचे संपर्क शोधून, संपर्कात आलेल्यांना लागण होण्यापूर्वीच क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार टास्कफोर्सने ५० टक्के रुग्ण लागण होण्याच्या आधीच शोधून काढले. त्यामुळे त्यांच्यापासून इतरांना संसर्ग झाला नाही. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पहिला कॉल असफिया कॉलनीचा 
अपर्णा थेटे यांनी सांगितले की टास्क फोर्सची स्थापना झाल्यानंतर २४ एप्रिलला असेफिया कॉलनीतून पहिला फोन आला. याठिकणी एक रिक्षाचालक कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळाली. त्याच्या घरी पोचताच घरातील लोक आम्हांला पहातच बसले. कोरोनाबाधिताच्या घरी पोचल्यामुळे मी देखील अस्वस्थ होते. रुग्णाच्या कुटुंबीयांना माहिती दिली पण सुरुवातीला कुटुंबात फक्त पाच सदस्य असल्याचा दावा केला गेला मात्र टास्क फोर्सने समजून सांगितल्यानंतर कुटुंबातील १७ सदस्यांना क्वारंटाईन करण्यास सहमती देण्यात आली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कुटुंबापासून दूर, हॉटेलमध्ये मुक्काम 
कोरोना संशयित रुग्णांच्या घरी जाऊन, त्यांच्या संपर्कातील इतरांना बोलणे, वेळप्रसंगी समजून सांगणे अशी कामे करावी लागत असल्यामुळे माझ्यापासून कुटुंबाला दूर ठेवणे गरजेचे होते. तसेच दिवसातून दहा ते १२ तास काम सुरू होते. त्यामुळे मी घरी न जाता दोन आठवडे हॉटेलमध्ये थांबले. या काळात माझ्या लहान मुलाचा वाढदिवस होता, तो देखील साजरा करता आला नाही. दरवर्षी आम्ही त्याचा वाढदिवस साजरे करायचो. परंतु, पहिल्यांदाच मुलाचा वाढदिवस साजरा केला नाही. दरम्यान असफिया कॉलनीतील पहिला रुग्ण बरा होऊन घरी पोचल्याचा फोन आला. ही माहिती मिळताच फोर्सच्या सदस्यांनी उत्सव साजरा केला. हा दिवस मुलाच्या वाढदिवसापेक्षा उत्साहवर्धक होता, असे श्रीमती थेटे यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT