संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाची मगरमिठी घट्ट, औरंगाबादेत आता २५६ रूग्ण

प्रकाश बनकर

औरंगाबाद - महिनाभरापूर्वी शहरात कोरोनाचे केवळ दोन रुग्ण होते. यामुळे शहरात कोरोनाची साथ आटोक्यात राहील असे वाटले होते. मात्र, आठवड्यापासून रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. गेल्या अठ्ठेचाळीस तासांत औरंगाबादेत दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर ७९ रुग्णांची भर पडली असून, एकूण संख्या २५६ वर गेली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय, घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. 

असे वाढले रूग्ण

शहरात शुक्रवारी (ता. एक) दिवसभरात ३९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर तर गुरुदत्तनगर, गारखेडा परिसरातील ४७ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी हॉटस्पॉट ठरलेल्या संजयनगर, मुकुंदवाडी येथील १८, नूर कॉलनी, आसेफिया कॉलनी येथील प्रत्येकी ३, भडकलगेट येथील एक, वडगाव येथील एक, गुलाबवाडी पदमपुरा येथील दोन, महेमूदपुरा येथील एक, सिटी चौक येथील एक, भीमनगर येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर याच भागातील रुग्णांच्या संपर्कातील सात रुग्ण सायंकाळी पॉझिटिव्ह आले. 
शनिवारी (ता.दोन) सकाळी नूर कॉलनीत-पाच, बायजीपुरा-११, कैलासनगर-तीन, जयभीमनगर-एक व किलेअर्क येथील-एक तसेच अन्य-दोन असे एकूण २३ रुग्ण आढळले. शनिवारी दुपारी चार वाजता टाऊन हॉल-दोन, किलेअर्क-एक, संजयनगर-एक, गौतम नगर-एक असे पाच रुग्ण वाढले. त्यानंतर रात्री १२ रूग्ण वाढले, त्यात जयभीमनगरातील ११ आणि नंदनवन कालनीतील एकाचा समावेश आहे. 

दाखल करताच मृत्यू 
नूर कॉलनीतील एका ६५ वर्षीय महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. कोरोनाचा हा नववा बळी असल्याची माहिती घाटी रुग्णालयाचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. या महिलेला आज सकाळीच गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण ‘बायलॅट्रल न्युमोनिया ड्यु टू कोविड - १९ इन केस ऑफ डायबिटीस मेलआयटस विथ हायपरटेन्शन विथ हायपोथायरॉयडिझम’ असे नोंदवण्यात आले आहे. मृत्युपश्चात त्यांचा स्वॅब घेण्यात आलेला होता; पण त्याचा अहवाल प्रतीक्षेत होता. सायंकाळी हा अहवाल प्राप्त झाला असून, तो कोविड - १९ पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली. 

  • उपचार घेत असलेले रुग्ण : २२३ 
  • बरे झालेले रुग्ण : २४ 
  • मृत्यू झालेले रुग्ण : ०९ 
  • एकूण : २५६ 

आतापर्यंत झालेले मृत्यू 

५ एप्रिल ः सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापक 

१४ एप्रिल ः आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक 

१८ एप्रिल ः बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिला 

२१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू 

२२ एप्रिल ः हिलाल कॉलनीतील ६० वर्षीय ज्येष्ठ 

२७ एप्रिल ः किलेअर्क येथील ६० वर्षीय महिला 

२८ एप्रिल ः किलेअर्क येथील ७७ वर्षीय महिला 

१ मे ः गुरुदत्तनगर गारखेडा येथील ४७ वर्षीय वाहनचालक 

२ मे ः नूर कॉलनी येथील ६५ वर्षीय महिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

तेजश्री प्रधानच्या झी मराठीवर दिसण्यावर स्टार प्रवाहच्या सतीश राजवाडेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती नायिका आधी...

IND vs ENG 3rd Test: जो रूटचे विक्रमी शतक! भारतासमोर मजबूत भिंतीसारखा राहिलाय उभा; राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT