Aurangabad Corona Updates 
छत्रपती संभाजीनगर

कोरोना पॉझिटिव्ह असूनही फिरतायत शहरभर, सरकारी कार्यालयात आढळले आणखी १२ बाधित

माधव इतबारे

औरंगाबाद : शहरातील सरकारी कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी (ता.आठ) पाच सरकारी कार्यालयात १३ जण पॉझिटिव्ह निघाले होते. मंगळवारी (ता.नऊ) त्यात आणखी १२ जणांची भर पडली आहे. कामांसाठी घराबाहेर पडणारे हे नागरिक अनेकांना कोरोनाचा ‘प्रसाद’ देत सरकारी कार्यालयात येत आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरातील पाच सरकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची ॲन्टीजेन चाचणी केली जात आहे. त्यातून आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

विशेष म्हणजे हे सर्वजण कुठलेही लक्षणे नसल्यागत कार्यालयात येत आहेत व ॲन्टीजेन चाचणीत कोरोना बाधित निघत आहेत. सोमवारी पाच कार्यालयात १३ जण पॉझिटिव्ह निघाले तर मंगळवारी पुन्हा १२ जण पॉझिटिव्ह आले. महापालिका मुख्यालयात दिवसभरात २१ जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले. पोलिस आयुक्त कार्यालय येथे ३१ जणांची चाचणी करण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयात ५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात चार पॉझिटिव्ह आढळून आले. विभागीय आयुक्त कार्यालयात ५७ जणांची चाचणी करण्यात आली असता एक जण पॉझिटिव्ह आढळून आला. तसेच आरटीओ कार्यालयात ७४ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात दोन पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT