Aurangabad Corona Updates sakal
छत्रपती संभाजीनगर

Corona Update Aurangabad : एकाच दिवसात तब्बल ४१० पॉझिटिव्ह!

शहरवासीयांनो, आता तरी सावध व्हा...पॉझिटिव्हिटी रेट पोचला १९.७५ वर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना संसर्गाचे रुग्ण शहरात झपाट्याने वाढत असताना बुधवारी (ता. १२) तिसऱ्या लाटेतील संख्येचा विस्फोट झाला. चार हजार २४४ नागरिकांच्या चाचण्यांतून तब्बल ४१० पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणेला धक्का बसला आहे. तसेच रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी हा रेट १९.७५ वर पोचला. त्यामुळे शहरवासीयांनो आता तरी सावध व्हा... असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. पण आजही अनेक जण रस्त्यावर विनामास्क फिरत आहेत. बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. त्याचा परिणाम रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात रुग्णांचा आकडा शंभरपर्यत होता. मात्र चालू आठवड्यात दोन दिवस पावणेतीनशे जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. बुधवारी तर कहर झाला पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ४१० वर पोचला. दरम्यान, पॉझिटिव्हिटी रेट १९.७५ एवढा झाल्याने शहर ‘डेंजर झोन’मध्ये आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे सौम्य असल्यामुळे अनेक जण घरीच राहून उपचार घेत आहेत. महापालिकेने अद्याप कोविड केअर सेंटर सुरू केलेले नाहीत. जोपर्यंत रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी डॉक्टरांकडून सूचना केली जात नाही, तोपर्यंत रुग्णाला कोविड सेंटरमध्ये भरती केले जाणार नाही, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

घरी उपचार घेण्यासाठी प्रमाणपत्र आवश्‍यक

होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेण्यासाठी एमडी डॉक्टरांचे प्रमाणपत्र रुग्णांना अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांची एमडी डॉक्टरकडून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावाधाव सुरू आहे. महापालिकेने कोविड केअर सेंटर सुरू केले नाही तर दुसरीकडे एमडी डॉक्टरांचे प्रमाणपत्र लवकर मिळत नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

पुन्हा तरुणच सर्वाधिक बाधित

कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक होती. आता तिसऱ्या लाटेतही सर्वाधिक बाधित तरुणच निघत आहेत. १८ ते ५० वयोगटातील ४१० जण पॉझिटिव्ह आहेत. त्यात २९० तरुण बाधित झाले आहेत. त्यापाठोपाठ ५० वर्षे वयोगटातील ७९ बाधित निघाले असून पाच ते १८ वयोगटातील ३५ जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये २५५ पुरुष असून १५५ महिलांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : ‘अर्नब’ चक्रीवादळाचा आंध्रप्रदेशला मोठा फटका, महाराष्ट्रातही वातावरण बदलले; 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Pune Election News: विरोधकांचे पारडे जड! ‘पदवीधर’ महाविकासकडे ‘शिक्षक’ महायुतीकडे; पुण्यातून हर्षदा देशमुख, कौस्तुभ गावडे विजय

नागपुरात भाजपला धक्का! पदवीधर निवडणुकीत नाट्यमय घडामोडी, काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी

Gokul Chairman Election : 'गोकुळ' अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट! महायुतीचे 12 संचालक गैरहजर राहण्याच्या तयारीत, सतेज पाटलांची सत्ता रोखण्यासाठी नवा डाव?

Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ तीन नोव्हेंबरपासून धावणार; महाराष्ट्रातील पहिली स्लीपर, आठवड्यातून सहा दिवस, नेमकं काय वेळाकपत्रक?

SCROLL FOR NEXT