covid 19 aurangabad
covid 19 aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

Corona Updates: औरंगाबादमध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे जवळपास चारशे नवीन रुग्ण

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: जिल्ह्यात मागील 24 तासांत कोरोना रुग्णवाढीत काही प्रमाणात घट झाली आहे. परंतू वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत जवळपास चारशे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आकडेवारीनुसार एकूण 388 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

गेली काही दिवस प्रतिदिन चारशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत होते. आता जिल्हा प्रशासनाने 11 मार्चपासून अंशतः लॉकडाउन लावलं आहे. तसेच आजपासून शहरात कोरोनाचे लसीकरण चोविस तास सुरु होत आहे. टेस्टींगचं प्रमाणही वाढवलं असल्याची माहिती आरोग्य विभागानं कळवली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात मागील 24 तासांत 550 जणांनी कोरोनावर मात केली आहे (मनपा 524, ग्रामीण 26). आजपर्यंत 49 हजार 009 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच नवीन 388 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळ जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 53 हजार 357 झाली आहे. कोरोनाने जिल्ह्यातील 1 हजार 296 जणांना प्राण गमवावा लागला आहे. सध्या एकूण 3 हजार 052 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळवली आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे-
मनपा (357) घाटी परिसर (2), एन नऊ श्रीकृष्ण नगर (1), समता नगर (2), बन्सीलाल नगर (1), गादिया विहार (5), राज व्हॅली (1), प्रताप नगर (1), हर्ष नगर (1), गजानन मंदिर परिसर (4), रेल्वे कॉलनी (1), पन्नालाल नगर (1), इटखेडा (1), नागेश्वरवाडी (2), बेगमपुरा (1), कासलीवाल तारांगण (3), देवगिरी व्हॅली, पडेगाव (1), मयूर पार्क (1), एन अकरा नवजीवन कॉलनी (1), एन तेरा, भारत नगर (1), जटवाडा रोड (1), शिवेश्वर कॉलनी, हर्सुल (1), एन अकरा (6), विना सो. (3), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (1), छत्रपती नगर, बीड बायपास (1), एन दोन, राम नगर (2), एन तीन सिडको (1), उत्तरानगरी, चिकलठाणा (1), सातारा परिसर (2), बीड बायपास (7), राजेश नगर (1),  सारंग सो., गारखेडा परिसर (1), टिळक नगर (2), कैलास नगर (1), मयूरबन कॉलनी (1), गारखेडा (3), पुंडलिक नगर (1),

अलंकार सो., (1), अय्यप्पा मंदिर (1), निरमन सो., (1), जालन नगर (1), आनंद विहार इटखेडा (1), शहांगज (2), शिवशंकर कॉलनी (1), अंगुरीबाग (1), विश्रामबाग कॉलनी (1), पद्मपुरा (2), मिलियन पार्क सो., (1), बजाज नगर (1), कोमल नगर (1), जय भवानी नगर (3), शिवाजी नगर (4),अरिहंत नगर (1), मातोश्री नगर (1), देवानगरी (1), नाथ प्रांगण (1), देवळाई (1), एन आठ (1), एन सात (1), एन पाच गुलमोहर कॉलनी (1), रोशन गेट (1), राणा नगर (1), कासलीवाल मार्वल, सातारा परिसर (1), भगतसिंग नगर, हर्सुल (1), उल्कानगरी (5),  विद्या नगर, सेव्हन हिल (1), भगवती कॉलनी (1), जवाहर कॉलनी (1), टीव्ही सेंटर (2), एन दोन ठाकरे नगर (1),  रामकृपा हा. सो (1), शहानूरवाडी (4), त्रिमूर्ती चौक (1), बीड बायपास, देवळाई परिसर (1), एन अकरा, रवी नगर (1), एन सात शास्त्री नगर (2),

भवानी नगर, जुना मोंढा (2), विजय नगर, सातारा परिसर (1), ज्ञानेश्वर नगर (1), दत्त नगर (2), मोहिरा चौक (1), उस्मानपुरा (2), न्यू बालाजी नगर (2), दशमेश नगर (1), हॉटेल प्लाजा, आरटीओ ऑफिसजवळ (1), न्यू एसबीएच कॉलनी (1), वेदांत नगर (2), एन चार सिडको (1), राम नगर (1), मनिषा कॉलनी (1), गजानन नगर (1), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंप जवळ (1), जाधववाडी (1),  बालाजी नगर (3), एन दोन सिडको (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), श्रेय नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), वेदांत नगर, एमआयडीसी (2), अमृतसाई प्लाजा, रेल्वे स्टेशन परिसर (2), कांचनवाडी (1), जुना भावसिंगपुरा (1), नूतन कॉलनी (1), दत्त मंदिर परिसर, बीड बायपास (1), म्हाडा कॉलनी, शहानूरवाडी (2), बन्सीलाल नगर (3), श्रीनिकेतन कॉलनी (1), न्यू श्रेय नगर (1), आनंद विहार, पैठण रोड (1), एकनाथ नगर (1), लक्ष्मी नगर (1), नागसेन कॉलनी (1), आदित्य नगर, गारखेडा परिसर (2), एसआपीएफ कॅम्प परिसर (1),  अन्य (184)
   
ग्रामीण (31)    
लासूर स्टेशन (2), वाळूज (2), रांजणगाव (1), शिवना, सिल्लोड (1), वडगाव को. (1), बजाज नगर (5), सिडको महानगर एक (2), अन्य (17)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू-
घाटीत हर्सुल येथील भगतसिंग नगरातील 76 वर्षीय पुरूष, वैजापूर तालुक्यातील तालखेड येथील 65 वर्षीय स्त्री, सिल्लोड तालुक्यातील बिलाल नगरातील 58 वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील शिवनेरी कॉलनीतील 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT