औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोसायट्यांमध्ये शेतकरी सर्व नियमांचे पालन करून शेतमालाची विक्री करतानाचे प्रातिनिधीक छायाचित्र
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोसायट्यांमध्ये शेतकरी सर्व नियमांचे पालन करून शेतमालाची विक्री करतानाचे प्रातिनिधीक छायाचित्र  
छत्रपती संभाजीनगर

Corona Virus : शेतमालाच्या विक्रीसाठी ‘सोशल मीडिया’ची पाटी 

मधुकर कांबळे

औरंगाबाद : दुष्काळ मग तो ओला असो की कोरडा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेलाच. मात्र यंदा शेतकऱ्यांपुढे नवीनच संकट उभे राहिले ते कोरोना महामारीचे. शेतात फळे, भाजीपाल्याचे भरघोस पीक आलेले मात्र ते विकायचे कसे असा प्रश्‍न पडला.

परंतु आजपर्यंत केवळ आलेले संदेश वाचणे, फोटो पाहणे एवढ्यापुरतेच मर्यादित असलेला सोशल मीडिया त्यांच्या कामी आला. व्हॉट्सॲपचा वापर करून हजारो क्विंटल फळे, भाजीपाल्याची शेतकऱ्यांनी लॉकडाउनच्या काळात तब्बल ५ कोटी २२ लाख ८४ हजार रुपयांच्या शेतमालाची विक्री केली. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची नवी आयडिया आली आहे. 

२२ मार्च रोजी जनता कर्फ्यू लागला आणि त्यानंतर लॉकडाउन सुरू झाला. त्यामुळे शेतमाल विकावा कसा असा शेतकऱ्यांपुढे प्रश्‍न पडला. एकीकडे शेतात शेतमाल खराब होण्याच्या मार्गावर तर दुसरीकडे शहरातील लोकांना भाजीपाला मिळणे दुरापास्त झाले. त्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

व्हॉट्सॲपवर शेअर केले फोटो 

कृषी विभागाच्या आत्माकडे (ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी) नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्यांच्या गटांमार्फत शहरातील ग्राहकांना फळे व भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले. श्री. मोटे यांनी सांगितले, की एका शेतकरी गटात किमान १५ ते २० शेतकरी आहेत. मात्र, जे गटामध्ये नाहीत त्यांनाही सहभागी करून घेण्यात आले. शेतमालाची ग्राहकांपर्यंत विक्री व्हावी यासाठी कृषी विभागाने संपर्क अधिकारी नेमले आहेत. हे संपर्क अधिकारी शहरातील वेगवेगळ्या सोसायट्यांतील रहिवाशांची कोणत्या शेतमालाची किती मागणी आहे, याची माहिती त्या शेतकरी गटांच्या ग्रुपवर टाकतात. सोसायट्यांच्या मागणीनुसार नियोजित दिवशी, नियोजित वेळेत शेतकरी तिथे जाऊन कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून शेतमालाची विक्री करतात. व्यापाऱ्यांपेक्षा या विक्रीतून शेतमालाला चांगला भाव मिळत आहे. 
 
शेतकरी म्हणतात...
 
अरूण गोल्हार (गोळेगाव, खुल्ताबाद तालूका) : लॉकडाऊनमुळे माल विकतो की नाही असा प्रश्‍न पडला होता. एक एकरात टमाटे, पत्ताकोबी, फुलकोबी आणि आद्रक लावली होती. व्हॉटसअप ग्रुपवर ऑर्डर मिळत गेल्या आणि सारा शेतमाल विकला गेला. शेतकरी गटातील शेतकऱ्यांचा आता वांगी, दोडकी, मेथी, कोथंबिर आणि इतर भाजीपाला मी शहरातील सोसाट्यांमध्ये विकत आहे. शेतकरी मार्केटमध्ये कोणत्या भाज्यांना काय भाव सुरू आहे यांची माहिती घेऊन ते त्यांच्या भाजीपाल्याचा भाव ठरवतात. त्यांचे प्रवासभाडे, तोलाई, हमाली वाचते. माझ्याकडे वाहन असल्याने त्यांच्या शेतमालाचे पैसे गावातच देऊन टाकतो आणि माल घेऊन ठरलेल्या सोसायट्यामध्ये देतो. ताजा भाजीपाला असल्याने सोसायट्यांमध्ये भावही चांगला मिळतो. सुरूवातीला ओळखी नव्हत्या मात्र व्हॉटसअपमुळे ओळखी झाल्या आता लोक फोन करून मागणी नोंदवत आहेत. हा उपक्रम असाच सुरू राहिला तर शेतकऱ्यांची अडवणुक होणार नाही, त्यांचे नुकसान होणार नाही. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गणेश शेळके (फेरण जळगाव, औरंगाबाद तालूका) : तीन एकरात द्राक्ष तर दीड एकरात मोसंबी आहेत. माल काढणीला दोन दिवस बाकी असताना लॉकडाऊन सुरू झाला. व्यापऱ्याला बाग विकली होती मात्र लॉकडाऊनमुळे त्यांनी आता फळे तोडून नेऊ शकत नसल्याने भरवशावर राहू नका असे सांगीतले होते तेंव्हा माल विकायचा कसा असा प्रश्‍न पडला होता. भाव कमी मिळाला असला तरी व्हॉटसअपमुळे १५ टन फळे विकली गेली. मागणी खूप आहे मात्र वेळ पुरत नाही. या माध्यमातुन आम्हाला शेतमालाची मार्केटींग आणि विक्री कशी करावी हे शिकायला मिळाले. 
 
शरद उढाण (तिर्थपुरी, घनसावंगी तालूका) : मोसंबीची साडे पाच- सहा एकरात एक हजार झाडे आहेत. व्हॉटसअपवर बागेचे निवडक फोटो, व्यवस्थापन कसे केले याविषयीची माहिती, मोसंबीची वैशिष्ट्ये टाकली होती. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ३०० रूपयाला १० किलोची बॅग याप्रमाणे विक्री केली. व्यापाऱ्यांनी ५ हजार रूपये टनने मागणी केली होती, मात्र या काळात मी व्हॉटसअपवर जाहिरात करून थेट ग्राहकांनी विकली तर ३० हजार रूपये टन भाव मिळाला आहे.

आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये २५ ते २६ टन मोसंबी विक्री झाली. आता फक्त २० टक्के माल बागेत आहे तोही विकला जाईल. या काळात बंदोबस्तावरील पोलिसांनाही पाच दहा किलो मोसंबी मी खाण्यासाठी दिले पण अनेक पोलिसांनी तुम्ही शेतकरी मेहनत करता मोफत नको म्हणत जबरदस्तीने पैसे दिले. कोण्या पोलिसांनी अडवणुक केली नाही असाही अनुभव या काळात आला. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT