CoronaVirus 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद @५४६ चौदा दिवसात ४९३ रुग्ण! आज ३८ पॉझिटिव्ह

मनोज साखरे

औरंगाबाद : शहरातील विशिष्ट भागात उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचा विळखा हळूहळू सर्व शहराला बसत आहे. आज (ता. १०) सकाळी तब्बल ३८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता औरंगाबादची रुग्णसंख्या ५४६ इतकी झाली आहे. केवळ १४ दिवसात ४९३ रुग्ण वाढले असून आधीच्या ४२ दिवसात ५३ रुग्ण होते. हे विशेष!

आज सकाळी औरंगाबादेत दत्तनगर १, चंपा चौक ५ आणि रामनगर येथे १५ रुग्ण आढळून आले आहेत. यात १४ पुरुष आणि, ७ महिला आहेत. आता रामनगर हा भाग नवीन हॉटस्पॉट बनला आहे. त्यानंतर काही वेळातच माहापालिकेचा अहवाल प्राप्त झाला. यात १७ रुग्ण कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आज सकाळीच ३८ रुग्णांना लागण झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शुक्रवारी (ता.आठ) दिवसभरात १०० रुग्णांची भर पडली होती. शनिवारी (ता.९) दिवसभरात ३० नव्या रुग्णाची भर पडली. आज ३८ असे सर्व मिळून जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या आकडा ५४६ पर्यंत पोचला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दौलताबाद, खुलताबाद व  गंगापूर तालुक्यात रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाचा ग्रामीण भागातही शिरकाव झाला आहे.

घाटीत ४२ रुग्णांवर उपचार
घाटीच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये (डीसीएच) ४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ३९ रुग्णांची स्थिती सामान्य, तर तीन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. ३८ कोरोना निगेटीव्ह रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. २३ कोरोना निगेटीव्ह बरे झाले असून, त्यांना सुटी मिळाली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सिल्क मिल कॉलनीतील ६० वर्षीय महिला, मकसुद कॉलनी, सिकंदर पार्क येथील ३७ वर्षीय महिला, मुकुंदवाडीतील राम नगरच्या ८० वर्षीय पुरुष, किलेअर्कमधील ३५ वर्षीय महिला, जुना बाजारातील ७५ वर्षीय पुरूष आणि आणि गंगापुरातील फुलशेवडा जिल्हा परिषद शाळा येथील ७६ वर्षीय पुरूष या रुग्णांचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तसेच पुंडलिकनगर येथील ५८ वर्षीय महिला रुग्णास घाटीतून मिनी घाटीत ८ मे रोजी संदर्भीत करण्यात आले आहे.

असा आहे कोरोना मीटर

उपचार घेत असलेले रुग्ण : ४६९
बरे झालेले रुग्ण : ६५
मृत्यू झालेले रुग्ण : १२
एकूण : ५४६

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: बिकेसीमधील MCAच्या क्लबवर FDAची कारवाई, रेस्टॉरंट तात्पुरते बंद

IND vs SL: शुभमन गिल सचिन, सेहवागच्या रांगेत बसला! कपिल देव यांचा रेकॉर्ड अवघ्या ७ दिवसांनी मोडला

Ashok Shirsat MPSC Success: शेतहमालाच्या मुलाची एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून राज्य कर निरीक्षक पदासाठी गवसणी ;आरंणगाव येथील ग्रामस्थांकडून मिळालेल्या यशाबद्दल अशोक शिरसाटचा सत्कार

Marathi News Live Updates : कावेरीचे पाणी सोडल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची कर्नाटक सरकारवर जोरदार टीका

Dhuloba Ramling Devasthan : कोल्हापुरातील हातकणंगले धुळोबा रामलिंग देवस्थानाकडे जाणारा रस्ता रात्रीतून जेसीबीने उकरला; भाविकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT