Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

वैजापुरातून कोरोना संशयित गायब, चारधाम यात्रा करून रुग्णालयात आला होता 

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर (औरंगाबाद) : राज्यासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असतानाच वैजापूर तालुक्यातील म्हस्की येथेही कोरोनाची लागण झाल्याचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. डाॅक्टरांनी त्याला घाटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. परंतु तो रुग्ण घाटीतही तपासणीसाठी पोहोचला नसल्याचे समजते. त्यामुळे आता या रुग्णाचा शोधून काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. 

या बातमीने सबंध वैजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रुग्ण हा कोरोना बाधित क्षेत्रातून प्रवास करून आल्यामुळे तो बाधित असण्याची भीती व्यक्त होत आहे. परंतु कोरोना विषाणूंची लागण झाल्याची चाचणी केल्यानंतरच खरे काय ते स्पष्ट होणार असल्यामुळे या रुग्णाला औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या देशात कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांची वाढ होत आहे. राज्यात ही संख्या 32 पर्यंत पोहोचली आहे. कोरोनाचे लोण आता ग्रामीण भागातही पसरायला सुरवात झाली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात 15 मार्च रोजी तालुक्यातील म्हस्की येथील एक रुग्ण तपासणीसाठी आला. त्याला खोकल्यासह ताप, सर्दी, डोकेदुखी, घसा दुखणे व श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.

विशेष म्हणजे तो चारधाम यात्रा करून दिल्लीहून ट्रेनने घरी परतल्याचे त्याने उपजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांना सांगितले. कोरोना बाधित शहर व क्षेत्रातून त्याने प्रवास केल्याने डाॅक्टरांचा संशय आणखी बळावला. कोरोनाची लक्षणे फारशी वेगळी नसली, तरी जो त्रास त्याला जाणवत होता. त्यावरून उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णास लेखी पत्र देऊन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेण्यास सांगितले.

रुग्ण घाटीत गेलाच नाही

कारण येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे डाॅक्टरांनी त्याला घाटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. परंतु तो रुग्ण घाटीतही तपासणीसाठी पोहोचला नसल्याचे समजते. दरम्यान हा रुग्ण कोरोना बाधित आहे, असे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी ठामपणे सांगू शकत नसले तरी दुसरीकडे तो कोरोना बाधित क्षेत्रातून प्रवास करून आल्यामुळे तो बाधित असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही ते सांगतात.

खोकला, सर्दी, ताप आदी लक्षणे असलेल्यामध्ये कोरोनाची लागण होऊ शकते. हुबेहूब तीच लक्षणे त्यात आढळून आल्याने तो कोरोनाचा रुग्ण असल्याचा संशय डाॅक्टरांनाही आला आहे. तपासणीनंतरच खरे काय ते स्पष्ट होईल, असे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान तालुक्यातील म्हस्कीसारख्या छोट्याशा गावात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागासह तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT