covid 19
covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

Covid 19 Lockdown| औरंगाबादेत ७९ दुकानांवर दंडात्मक कारवाई

मधुकर कांबळे

औरंगाबाद: कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’च्या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने नेमलेल्या पथकांनी रविवारी (ता. २३) शहरात फिरून नियम तोडणाऱ्या ७९ दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. या दुकानदारांकडून १ लाख ७० हजाराचा दंड वसूल केला.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, अनेकजण या काळात निष्कारण फिरत आहेत. काही विक्रेते ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवत आहेत. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र दहा पथके तैनात केले आहेत. ही पथके पोलिसांना मदत करत आहेत.

महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले ‘ब्रेक दि चेन’ ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आहे. गेल्या महिन्यापासून पोलिस व महापालिका कर्मचारी ‘ब्रेक दि चेन’ची अंमलबजावणी करीत आहेत. चांगल्या प्रकारे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली तर कोरोना संसर्गाची साखळी तुटणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमाचे पालन करून कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करावे.

पथकातील अधिकाऱ्याला धक्काबुक्की
संचारबंदीत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास प्रशासनाकडून मुदत देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून व्यापारी चोरून लपून यानंतरही व्यवहार करीत असल्याने कारवाई सुरू केली आहे. रविवारी गणेश कॉलनी भागातील रशिदपुरा येथे महालिकेचे पथक गेले. येथे एका व्यापाऱ्याला नियोजित वेळेनंतर व्यवहार करताना पकडले. पथक दंडात्मक कारवाई करताना परिसरातील काही नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.

संबंधित व्यापाऱ्याला नंतर दंड आकारण्यात आला. परंतु, पथकातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली नाही. कारवाईसाठी गेलेल्या पथकावर जमाव चालून आल्याचे कळताच संबंधित अधिकारी शहापूरवाड यांना गुन्हा दाखल करण्याची गरज आहे का? अशी विचारणा करण्यात आली. त्यांनी यासंदर्भात नकार दिला, असे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Jadeja CSK vs RR : रविंद्र जडेजाचं 'ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड', मुद्दाम केलं की ठरला अनलकी? पाहा VIDEO

Delhi Bomb Threat : सरकारी रुग्णालयांनंतर दिल्लीतील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

IPL 2024 RCB vs DC Live Score : दिल्लीची अवस्था खराब; आरसीबीने 4 षटकात केले 4 फलंदाज बाद

SCROLL FOR NEXT