corona vaccination corona vaccination
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत आता फक्त दुसरा डोस!

१८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण तात्पुरते स्थगित, शहराला मंगळवारी मिळाल्या साडेनऊ हजार लसी

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लसींचा खेळखंडोबा सुरूच आहे. महापालिकेला आणखी साडेनऊ हजार लसी मिळाल्या असल्या तरी त्यातून फक्त ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जाणार आहे. राज्य सरकारतर्फे सुरू असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

शहरात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचे वांधे झाले आहेत. नागरिकांना तासन्तास रांगेत थांबल्यानंतरही लस मिळेल का? याची शाश्‍वती राहिलेली नाही. तसेच वारंवार लसीकरण केंद्र बदलले जात आहेत. अचानक शासनाकडून लसींचा पुरवठा केला जातो तर कधी लसीच मिळत नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरात आतापर्यंत दोन लाख ६० हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्यात दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत १४ हजार नागरिक आहेत. लसींचा पुरवठाच कमी होत असल्याने दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने नागरिकांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.

त्याकरिता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी महापालिकेला नऊ हजार ५०० एवढ्या लस मिळाल्या. तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मिळालेली लस देखील दुसरा डोस देण्याकरिता वापरली जाणार आहे. बुधवारी (ता.१२) दुसऱ्या डोससाठी ६० केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

कोव्हॅक्सीन मिळणार सहा केंद्रांवर
कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याकरिता सादातनगर, कैसर कॉलनी, मुकुंदवाडी, क्रांती चौक, चेतनानगर, लायन्स नेत्र रुग्णालय एन-१ या सहा केंद्रावर बुधवारी व्यवस्था करण्यात आली आहे.

पाच हजार जणांनी घेतला पहिला डोस
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना राज्य शासनातर्फे मोफत लस दिली जात आहे. त्यासाठी सहा केंद्र तयार करण्यात आले होते. तिथे पहिला डोस दिला जात आहे. आतापर्यंत पाच हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यानंतर आता लसीकरणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus Accident : लोक खरेदी करत होते, तेवढ्यात बस आली अन्...; भांडूप बस अपघाताचा CCTV VIDEO समोर

Nagpur : फडणवीसांच्या विश्वासू कार्यकर्त्याला भाजपनं नाकारलं तिकिट, नाराजी व्यक्त करत दिला राजीनामा

BEST Bus: मुंबईकरांसाठी धावणार अतिरिक्‍त बेस्‍ट बस, नववर्षाच्या स्वागतासाठी प्रशासनाचा निर्णय; कसे असेल नियोजन?

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

समृद्धी महामार्गावर ट्रक अपघातात वाचले, रस्त्यावर थांबले असताना रुग्णवाहिकेनं उडवलं; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT