Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad| सुनेने केला सासूचा खून, जळालेले लाकूड मारले डोक्यात मारले

दोघी सासु-सुनामध्ये कडाक्याचे भांडण

चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : नेहमीच वाद होणाऱ्या सुन व सासुच्या झालेल्या भांडणात शेवटी सुनेने घरातील चुली शेजारील जळक्या लाकडाने सासुच्या डोक्यात वार करुन खुन केल्याची घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पाटेगाव (ता.पैठण) येथे बुधवारी (ता.२७) घडली. कौसाबाई अंबादास हरवणे (वय ५५) असे खुन झालेल्या सासुचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुन कांचन गणेश हरवणे व सासू कौसाबाई हरवणे यांच्यात नेहमी भांडणे होत असे. मंगळवारी (ता.२६) रात्रीही नेहमी प्रमाणे भांडण झाले. यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान या दोघी सासु-सुनामध्ये कडाक्याचे भांडण झाले. (Daughter In Law Killed Mother In Law By Burning Wood In Paithan Taluka Of Aurangabad)

त्यात सुनबाईने घरातील चुलीजवळ पडलेले जाड अर्धवट जळालेले लाकुड सासुबाईच्या डोक्यात मारले असता सासुच्या डोक्यातुन रक्तस्त्राव सुरु झाला व सासुचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ विशाल नेहुल, पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी भेट देऊन मृत सासुचा मृतदेह पंचनामा करुन पैठण (Paithan) येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Statement : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये काय घडलं, जयंत पाटलांनी घटनाक्रम सांगितला

T20 World Cup स्पर्धेवर निपाह व्हायरसचे संकट? भारतातील सामने दुसरीकडे खेळवले जाणार? बांगलादेशी, पाकिस्तानींचा 'डाव'

Latest Marathi News Live Update : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या बीडच्या दोघांना तामिळनाडूमध्ये अटक

JEE अन् IIT ची तयारी करणाऱ्यांचे लाखो रुपये वाचणार! गुगल फ्रीमध्ये देत आहेत मॉक टेस्ट पेपर; पाहा कशी सुरू करायची प्रॅक्टिस?

Bigg Boss Marathi 6 : तिसऱ्या आठवड्यात धक्कादायक Eviction ? रेडिटच्या रिपोर्टनुसार बाहेर पडला 'हा' सदस्य

SCROLL FOR NEXT