Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद ग्रामीणमधुन एक लाखाहून अधिक ई-पासचे वाटप 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीयासोबत अन्य व्यक्तींना आपल्या गावी जाता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने एक लाख सहा हजार ३३ जणांना ई-पास दिल्या. एक हजार ५५४ अर्ज प्रलंबित असून मंजूर; पण वैधता संपलेल्या अर्जाची संख्या एक लाख तीन हजार ९५७ एवढी आहे. यामुळे अनेकांना आपल्या गावी जाता आले. दरम्यान, प्रशासनाने २३ हजार ३४३ अर्ज नाकारले. 

लॉकडाउनमुळे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात लोक अडकून पडले होते. त्यानंतर ई-पास घेऊन आपापल्या गावी जाता येईल, असे जाहीर करण्यात आले. सुरवातीला हे काम गृहविभागांतर्गत करण्यात आले. मात्र, संख्या वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामीणची जबाबदारी ही जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आली. याकामी एक पथक नेमण्यात आले होते.

या लॉकडाउनच्या काळात ई-पास मिळताच उपलब्ध विविध साधनाने संबंधितांनी घर जवळ करण्यास सुरवात केली. वैद्यकीय कारणांसाठी, नातेवाइकांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कार्यक्रमास अशा विविध कारणांसाठी पासेससाठी अर्ज करण्यात येतो. ज्यांना खरेच गरज आहे. अशांना ई- पासेस उपलब्ध करून देण्यात आले. 

असा करा अर्ज 
www.kovid19.mhpolice.in या वेबसाईटवरून ई-पाससाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. संबंधित व्यक्तीला प्रवासाचे कारण, प्रवास कुटून कुठे करणार, प्रवासाचे कारण, प्रवासाची तारीख, सहप्रवासी संख्या, नावे, वाहनक्रमांक याबाबतची माहिती भरावी लागते. याशिवाय अर्जदाराचे छायाचित्र, कोविड-१९ ची लक्षणे नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे. अर्ज व्यवस्थित भरलेला असेल तर अवघ्या काही वेळातच ई-पास उपलब्ध करून दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT