aurnagabad
aurnagabad sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : नववर्षात पर्यावरणाचे भान...उभारले जैवविविधता उद्यान!

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पर्यावरण संवर्धनाच्या(envoirnment) अनुषंगाने जनसहयोग संस्थेने व्यापक प्रमाणात वृक्ष लागवडीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून कोहलर इंडिया आणि जनसहयोग संस्थेने नवीन वर्षाच्या सुरवातीलाच तिसऱ्या जैविविधता उद्यानाच्या उभारणीला सुरुवात केली आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत(chikalthana midc) साधारण तीन एकर परिसरात एक हजार वृक्ष लागवडीला(Tree planting) सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. तीन) जनसहयोग संस्था आणि कोहलर इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ७०० रोपांची लागवड करण्यात आली.

उर्वरित तीनशे झाडे रविवारी (ता. नऊ) लावण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी मसीआने तीन एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. तर यासाठी लागणारा निधी कोहलर इंडियाने उपलब्ध करून दिला आहे. जनसहयोग संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गिरे यांच्या पुढाकाराने सामाजीक बांधिलकीचा भाग म्हणून सर्व वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. पहिल्या दिवशी कोहलर इंडीयाच्या दोनशेहून अधिक अधीकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. या ठिकाणी १०० पेक्षा अधिक प्रकारच्या देशी, दुर्मिळ आणि औषधी प्रजाती लावण्यात येत आहेत.

जनसहयोग संस्थने गेल्या तीन वर्षापासून दुर्मिळ झाडे लावून त्याचे जतन करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचप्रमाणे संस्थेने मागच्या ८ वर्षात २८ ठिकाणी १ लाखाहून अधिक झाडे लावली आहेत. छावणी परिषद डम्पिंग ग्राउंड वर १६० प्रकारच्या प्रजाती लावून त्याचे जतन केले आहे. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी प्रक्षेत्र पडेगाव येथे साधारणतः २५ एकर जागेवर १५० प्रकारच्या प्रजाती लावून दररोज श्रमदान करून त्याचे जतन करून जैवविविधता उद्यान उभारले आहे. त्यानंत आता चिखलठाणा औद्योगिक वसाहातीत हे तीसरे जैवविविधता उद्यान उभारणीलास सुरवात केल्याची माहिती जनसहयोगचे अधक्ष प्रशांत गीरे यांनी दिली.

वृक्ष लागवड मोहिमेत नाना आगलावे, राजू शिंदे, अण्णा वैद्य, डॉ. प्रदीप बेनजर्गे, गजानन मांडोळे, कोहलरचे मनीष पुराणिक, श्याम जिबकाटे, गणेश देशपांडे, राहुल नायर यांनी श्रमदान केले. तर हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी जनसहयोग संस्थेचे तनिष्क कासार, सय्यद फुरकान, मृणाल देवळे, कैलास खांड्रे, आकाश निरंजन, रशीद भाई, संदीप जगधने, किशोर कासार, शाम अण्णा जेपल्लीकर, अमोल मोरे, संतोष दंडीमे, निशांत मनसिगका, प्रदीप यादव, संतोष कुंडेटकर, प्रशांत गिरे, नंदकिशोर सोनार, बाबुराव थोरात, शिवाजी भींताडे हे परिश्रम घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT