file photo 
छत्रपती संभाजीनगर

ईपीएफतर्फे एक लाख ३७ हजार दावे निकाली

प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पीएफधारकाला तीन महिन्यांचे मूळ वेतन व महागाई भत्ता, अथवा कर्मचारी भविष्य निधी खात्यातील जमा असलेले ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते. यासाठी देशभरातील एक लाख ३७ हजार दावे अवघ्या दहा दिवसांत निकाली काढण्यात आले. यात मराठवाड्यातील हजारो अर्जांचा समावेश आहे, अशी माहिती क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे देण्यात आली. 


केंद्र सरकारतर्फे कोरोना पार्श्वभूमीवर कामगारांसाठी ही योजना आणली आहे. योजनेमध्ये पॅरा ६८ एल (तीन) अंतर्गत तीन महिन्यांचे मूळ वेतन व महागाई भत्ता अथवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा रकमेच्या ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम या दोन्हीमध्ये जी कमी आहे ती नॉनरिफंडेबल उचल करू शकतात. आतापर्यंत २७९ कोटी ६५ लाख रुपये एक लाख ३७ हजार जणांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

याअंतर्गत भविष्य निर्वाह निधी सदस्य या रकमेसाठीही अर्ज करू शकतो. हा प्राप्तिकराच्या कक्षेत येत नाही. कोविड-१९ च्या अनुषंगाने मागणी विचारात घेऊन भविष्य निर्वाह निधी संघटनेने २४ तासांत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यासाठीची नवीन सॉफ्टवेअर विकसित केले. याच माध्यमातून अर्ज स्वीकारत ते निकाली लावण्याचे काम सुरू आहे. सोशल डिस्टन्सचे पालन करण्यासाठी पेपरलेस फॉर्म आणि ऑटो मोडद्वारे दाव्यांचा निपटारा करण्यात येत आहे. अशाच पद्धतीने ऑनलाइनद्वारे आलेले एक लाख ३७ हजार दावे अवघ्या दहा दिवसांत निकाली लावण्यात आले आहे. यात जन्मतारखेच्या सुधारणेचे मापदंड शिथिल करण्यात आले आहे. जेणेकरून सदस्यांना आपला दावा ऑनलाइन करता येईल. केवायसी पूर्ण असलेल्यांचा अर्ज आल्यानंतर ७२ तासांत प्रोसेस करण्याची क्षमता या सॉफ्टवेअरमध्ये आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

केवायसी पूर्ण असलेल्या इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही क्षेत्रीय प्रचार कार्यालय औरंगाबादतर्फे करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

PMC power saving deal flop: वीज बचतीचा 'महा-फ्लॉप' करार - महाप्रितला भार सोसेना

Gadhinglaj MIDC Industrial Growth Analysis : कोल्हापूर, कागल एमआयडीसी 'फुल्ल'! गडहिंग्लजमध्ये सात हेक्टर जागा शिल्लक; नव्या उद्योगांसाठी मोठी संधी

सोलापूरच्या सुपूत्राच्या ‘मदार’ चित्रपटाने पाणावले डोळे! पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, फ्रान्सच्या ‘कान्स’ महोत्सवात कौतूक, वाचा...

SCROLL FOR NEXT