Excessive Stump Duty Affect Toys Market
Excessive Stump Duty Affect Toys Market  
छत्रपती संभाजीनगर

स्टॅम्प ड्युटीमुळे खेळण्यांचे मार्केट संथ

प्रकाश बनकर

औरंगाबाद : लहान मुलांच्या खेळण्यांचे मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक खेळण्यांसोबत आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स खेळणी बाजारात आली. पाळणा, वॉकरपासून ते इलेक्ट्रॉनिक सायकल, छोट्या कार्सपर्यंतच्या सर्व खेळण्यांना मागणी आहे; मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात परदेशातून आयात होणाऱ्या चिल्ड्रन्स टॉयवर चाळीस टक्के स्टॅम्प ड्युटी वाढवल्यामुळे हे मार्केट सध्या संथपणे सुरू आहे. 


चिल्ड्रन टॉयचे मार्केट मोठे आहे. जिल्ह्यातही जानेवारी महिन्यापर्यंत जवळपास एक कोटीची उलाढाल या मार्केटमध्ये होती. शहरात ३० ते ४० रिटेलरच्या माध्यमातून या खेळणीची विक्री होते. चार ते पाच मोठ्या होलसेलरच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात खेळणी रिटेलरपर्यंत जाते. केंद्रीय अर्थसंकल्पात परदेशातून आयात होणाऱ्या विशेषतः चीनच्या खेळण्यांवर २० टक्‍क्‍यांवरून ६० टक्के आयात कर लावण्यात येत आहे.

त्यामुळे या खेळण्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पूर्वी सहा हजाराला येणारी खेळणी आता साडेसात हजार रुपयांत विक्री होत आहे. याचा फटका ग्राहकांना बसत असल्याचे होलसेलर अमोल शिंदे यांनी सांगितले. 

हेही वाचा : योगी ठाकूर यांना ही जाब विचारा  - इम्तियाज जलील  

मॉलमध्ये विशेष चाइल्ड सेक्शन 
चिल्ड्रन्स ब्रँडेड टॉय विक्रीसाठी शहरात स्वतंत्र दुकाने आहेत. यासह प्रोझोन मॉलमध्ये लहान मुलांच्या खेळणी विक्रीचे स्वतंत्र शॉप आहेत. मॉलमधील महेंद्रा व्हेंचर्सचे फर्स्ट क्राय डॉट कॉम या शॉपमधूनही मोठ्या प्रमाणावर लर्निंग चिल्ड्रन टॉय विक्री होत असल्याची माहिती शॉपचे व्यवस्थापक प्रदीप घुसळे यांनी दिली. जिल्ह्यातील चिल्ड्रन टॉयची बाजारपेठ मोठी आहे. यातून महिन्याकाठी एक कोटी तर वर्षाला बारा कोटींहून अधिकची उलाढाल होते; मात्र महिनाभरापासून हे बाजारपेठ संथगतीने सुरू आहे. आयात करात केलेली वाढ यामुळे वस्तूंच्या वाढलेल्या किमती यामुळे ग्राहक दुरावला आहे. 

चायना वस्तूंवर बंदी करण्यासाठी आणि मेड इन इंडियाला चालना देण्यासाठी आयात कर वाढविण्यात आला आहे. यामुळे वस्तूंत वाढ झाली, यासह वस्तूंची आयात करताना प्रत्येक कंटेनरमधील वस्तूंची लॅब टेस्टिंग करण्यात येत आहे. एका वस्तूची लॅब टेस्टिंग करण्यासाठी साधारणतः २० हजार, तर बॅटरी नसलेल्या वस्तूसाठी दहा हजार रुपये खर्च येतो. यामुळे अनेक होलसेलरनी आयात करणे बंद केले असून, अनेकांनी हा व्यवसाय बंद केला आहे. 
- अमोल शिंदे, चिल्ड्रन टॉयचे होलसेलर. 
 
चिल्ड्रन टॉयचे मार्केट औरंगाबादेत चांगले आहे. आमचे शॉप दहा वर्षांपासून प्रोझोन मॉलमध्ये आहे. सध्याही चांगला प्रतिसाद आहे आणि आमचा एक वर्ग ठरलेला आहे तो वर्ग ब्रँडेड वस्तू टॉयमध्ये खरेदी करतो. 
- प्रदीप घुसळे, व्यवस्थापक, फर्स्ट क्राय डॉट कॉम शॉप. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT