Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad | बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू, बाप-लेकाला पोलिसांनी पकडले

युवकाला लोखंडी गजाने बेदम मारहाण

ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : ७४ जळगाव येथील खंडोबा मंदिराच्या ओट्यावर बसुन आमच्या घराकडे टक लावून पाहतो. या कारणावरून लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याने युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बिडकीन पोलिसांनी आरोपी बापलेकाना अटक केली असता पैठण न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील ७४ जळगाव येथील संतोष प्रकाश एरंडे या युवकाला शुक्रवार (ता.आठ) सायंकाळीच्या वेळी संजय रावसाहेब गटकळ व त्याची मुले जीवन गटकळ, वैभव गटकळ या तिघांनी मिळून गावातील खंडोबा मंदिर वाटेत बसून आमच्या घराकडे टक लावून का पाहतो म्हणून लोखंडी गजाने बेदम मारहाण करून जखमी केले. (Father Son Beaten Youth In Paithan Taluka Of Aurangabad)

या दरम्यान संतोषचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्याची आई मंदाबाई एरंडे धावत पळत मंदिराजवळ गेली. त्याला का मारता असे विचारले असता आरोपींनी मला ढकलून देत लोखंडी गजाने मुलांच्या डोक्यावर हातपायावर, पाठीवर जबर मारहाण करून जखमी केल्याने पुढील उपचारासाठी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केल्याची तक्रार शनिवार (ता.दहा) बिडकीन पोलिस ठाण्यात मंदाबाई एरंडे यांनी दिली. मात्र आज मंगळवारी (ता.१२) उपचारादरम्यान जखमी युवकाचा मृत्यू झाला आहे.

त्यावरून जमादार सोमनाथ तांगडे यांच्या चमूने ७४ जळगाव येथे पंचनामा केला व तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय दंड संहितानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जगदीश मोरे, हवालदार सोमनाथ तांगडे हे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

आठवडाभरापूर्वी मातृशोक, नितीश राणाने मैदानात उतरत आईला वाहिली अनोखी श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT