Aurangabad Fire News
Aurangabad Fire News  esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad News| औरंगाबादेतील चिकलठाणा कचरा डेपोला भीषण आग

माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेच्या चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्राला शुक्रवारी (ता.१५) पहाटे भीषण आग लागली. त्यात ओला व सुका कचरा वेगवेगळा करणाऱ्या बेलींग मशिन जळाल्या. शेडचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाने शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी आग आटोक्यात आली. मात्र बेलींग मशीनचे नुकसान झाल्याने सुक्या कचऱ्यावरील प्रक्रिया बंद पडली आहे. आग कशामुळे लागली ? नेमके नुकसान किती झाले याचा अंदाज अधिकारी घेत आहेत.
चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रात (Chikalthana Garbage) जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेने खासगी कंत्राटदाराला दिले आहे. कंत्राटदाराचे कर्मचारी रात्री १२ वाजेपर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया करत होते. त्यानंतर ते झोपी गेले दरम्यान पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ज्या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या होतात, तिथे प्रचंड आग लागली. (Fire Broke Out In Chikalthana Garbage Depot In Aurangabad)

हा प्रकार लक्षात येताच अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.अग्निशमन विभागाने चार गाड्यांच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. दिवसभर दोन गाड्यांच्या माध्यमातून पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणले जात आहे. दरम्यान घनकचरा विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सौरभ जोशी यांनी पहाटे कचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी शहरातून आलेल्या कचऱ्याच्या ट्रक रिकाम्या होतात, त्याठिकाणी आग लागली होती. त्याला लागूनच बेलींग मशिन आहेत. बेलींग मशिनचे या आगीमुळे नुकसान झाले आहे. तसेच प्रकल्पाच्या शेडला देखील फटका बसला आहे. सध्या सुक्या कचऱ्यावरील प्रक्रिया बंद पडली असली तरी ओल्या कचऱ्यावर मात्र प्रक्रिया सुरू आहे. आगीची पाहणी केल्यानंतर प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना माहिती देण्यात आल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.

कशामुळे लागली आग ?
कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना महापालिकेसाठी नव्या नाहीत. पडेगाव कचरा डेपोच्या परिसरात पडून असलेल्या कचऱ्याला वारंवार आगी लागतात. चिकलठाणा येथे प्रक्रिया केंद्रातील कचऱ्याला आग कशामुळे लागली? या विषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज कर्मचारी व्यक्त करत असले तरी अद्याप स्पष्ट कारण समोर आले नसल्याचे सौरभ जोशी यांनी सांगितले.

सुका कचरा पडेगाव प्रकल्पाकडे वळवला
चिकलठाणा व पडेगाव प्रकल्पाची दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. मात्र आता चिकलठाणा कचराडेपोत येणारा सुका कचरा पडेगाव कचरा डेपोत नेला जात आहे, असे जोशी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT