Antigen Tests in Industrial Estates Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

सर्वच औद्योगिक वसाहतींमध्ये अँटीजेन चाचणीसाठी पाठपुरावा

प्रकाश बनकर

औरंगाबाद : शहरासोबतच औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तो संसर्ग कमी करण्यासाठी औद्योगिक संघटनातर्फेही उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे कंपनीस्तरावर अँटीजेन टेस्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या टेस्टसाठी किती खर्च येणार, उपाययोजना कशी करावी, याविषयी उद्योग संघटनांतर्फे चर्चा करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती उद्योग संघटनांतर्फे देण्यात आली. 

वाळूज, शेंद्रा व चिकलठाणा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. तो कमी करण्यासाठी औद्योगिक संघटनांतर्फे जनजागृती व इतर उपाययोजना सुरू आहेत. १५ जुलै रोजी फिजिकल डिस्टन्स पाळत उद्योग संघटनांची बैठक झाली. तीत अँटीजेन टेस्ट कंपनी स्तरावर राबवता येईल का, यासाठी किती खर्च येईल, महापालिका व जिल्हा प्रशासनाची कशी मदत घेता येईल? या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. 

यात काही मोठ्या कंपन्यांतर्फे कर्मचाऱ्यांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती संघटनांतर्फे देण्यात आली; मात्र छोट्या कंपन्यांना महापालिका किंवा ईएसआय दवाखान्याच्या माध्यमातून ही टेस्ट करता येईल का, याचीही चाचपणी करण्यात येत आहे. याविषयी येत्या दोन दिवसांत निर्णय होणार असल्याचे उद्योग संघटनेतर्फे सांगण्यात आले. या बैठकीस सीएमआयए, मासिआ, सीआयआय या सर्व संघटनांनी सहभाग घेतला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सर्व औद्योगिक संघटनांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठीच्या जनजागृतीसाठी स्वयंसेवक नेमले होते. हे स्वयंसेवक कर्मचाऱ्यांना कोरोनापासुन कसा बचाव करायचा, कशी काळजी घ्यायची या विषयी जागृत करण्याचे काम करणार आहे. याविषयी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहेत. लॉकडाऊन संपल्यावर स्वयंसेवक काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT