Corona News Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

Corona : नियम पाळा, अन्यथा होऊ शकते ही कारवाई... 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाची शहरातील साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने सहा दिवस कडक लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. बुधवारी ही मुदत संपली. त्यामुळे गुरुवारपासून (ता. २१) जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू झाली आहेत. अपेक्षेप्रमाणे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. नागरिकांसह, दुकानदार, भाजीपाला विक्रेत्यांनी सुरक्षित अंतर पाळणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करून काळजी घ्यावी, यासंदर्भात महापालिकेने नियमावली तयार केली आहे. नियम न पाळल्यास लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय १४ मे रोजी वरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. रात्री ११.३० वाजता आदेश काढून सहा दिवस जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने-भाजीपाला विक्री बंद करण्यात आली. गुरुवारी ही मुदत संपली. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासकांनी मंगळवारी आदेश काढून ३१ मेपर्यंत जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी सकाळी सातपासून किराणा दुकाने व भाजीपाला विक्री सुरू झाली. शहरात कोरोनावाढीसाठी किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेतेदेखील कारणीभूत ठरल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने नव्याने आदेश काढताना खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. असे असले तरी नागरिकांना स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागेल. तब्बल आठ दिवसांनंतर दुकाने सुरू झाली असल्यामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली. 

चोवीस तास घरपोच सेवा 
आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी काढलेल्या आदेशात कन्टेनमेंट झोनमध्ये घरपोच वस्तू पुरविण्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. कुठल्याही प्रकारचा यात व्यत्यय येणार नाही, हे लक्षात घ्यावे असे आदेशात नमूद केले आहे. 

अशा आहेत नव्या सूचना 
फळे व भाजीपाला विक्री करताना चेहऱ्याला मास्क बंधनकारक. 
विक्रेते सुरक्षित अंतर पाळून फळे, भाजीपाला विक्री करतील. 
विक्रेत्यांनी पाव, अर्धा व किलोचे पॅकेट तयार करावेत, यात वेळ वाचेल. 
बाजार समितीतील गर्दी टाळण्यासाठी शेतकरी गटांकडून भाजीपाला खरेदी करावा. 
शेतकरी गटाचे नियोजन सहकारी संस्था सहउपनिबंधकांनी करावे. 
ऑनलाइन खरेदीसाठी प्रोत्साहन द्यावे. 
फळे-भाजी विक्रेत्यांचा परिसर निर्जंतूक करावा. 
विक्रेत्याने दर दोन तासांनी हात धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा. 
या सूचनांचे पालन करणार नाही, त्याच्याविरोधात लायसन्स रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. 

हे करू शकता... 
यासंदर्भात माजी सनदी अधिकारी कृष्णा भोगे यांनी सांगितले, की कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर हेच पर्याय आहेत. त्यामुळे प्रत्येक आवश्‍यक सेवेचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. 
 सकाळी सात वाजता कोणी दुकानांवर जात नाही. त्यामुळे वेळ आठ ते किमान पाच वाजेपर्यंत करण्यात यावी. 
 ज्या दुकानांवर सुरक्षित अंतर पाळले जात नाही, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावे. 
 भाजीपाल्यासह इतर वस्तू प्रत्येक भागात मिळायला हव्यात. 
 या ठिकाणी नियमांचे पालन होत किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यांवर देण्यात यावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT