Crime 
छत्रपती संभाजीनगर

अवघ्या दोन तासाच्या बाळाचे छाटले होते मुंडके, अनैतिक संबंध, बदनामीच्या भितीने कृत्य, ४ अटकेत

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: अनैतिक संबंधातून जन्मल्यामुळे बदनामी होईल म्हणून अर्भकाचे मुंडके छाटून धड वेगळे करणाऱ्या वैरिणी मातेसह चौघांना सिटी चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गीताबाई अजय नंद (वय ३४) असे तिचे नाव असून, रतनलाल भोलाराम चौधरी (७५), गंगाबाई रतनलाल चौधरी (७०) व हरीशकुमार सुभाषलाल पालिवाल (३८, सर्व रा. दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे, छावणी मोहल्ला) अशी तिच्या साथीदारांची नावे आहेत. 

रतनलाल चौधरी व हरीशकुमार पालिवाल या दोघांना सोमवारी रात्री तर दोन महिलांना मंगळवारी (ता.१६) सकाळी पोलिसांनी अटक केली. प्रकरणात महापालिकेचे साफसफाई विभागाचे सुपरवायझर सतीश मगरे (४७, रा. लेबर कॉलनी) यांनी तक्रार दिली.

तक्रारीनुसार, २९ एप्रिलरोजी सकाळी सफाई कर्मचारी विजय साळवे हे ठोले हॉस्पिटल (राजाबाजार परिसर) कवटीचा वाड्याशेजारी लावलेली घंटागाडी आणत असताना चौधरी नावाच्या वॉचमनने साळवे यांना थांबवत, ठोले हॉस्पिटलच्या गल्लीत कुत्र्याच्या तावडीतून लोकांनी सोडविलेले बाळाचे मुंडके पडलेले असल्याचे सांगितले. साळवे यांनी ही माहिती मगरे यांना दिली. सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी अर्भकावर बेगमपुरा स्मशानभूमीत अत्यंविधी केला. 

दीड महिना सखोल तपास 
हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय होता. पोलिसांनी दीड महिना सखोल तपास केला. त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी वरील चौघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्मल्यामुळे बदनामी होऊ नये यासाठी अर्भकाच्या जन्मानंतर अवघ्या दोन तासांत मुंडके छाटून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. महत्त्वाचे म्हणजे आधी दोन खासगी दवाखान्यात बाळंतपणाचा प्रयत्न करून पाहिल्यानंतर अखेर एका सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करण्यात आली होती, असेदेखील तपासात समोर आले आहे. 

आता उर्वरित धड पुरल्याचा तपास सुरू 

चौघा आरोपींना १८ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. एम. पोतदार यांनी दिले. दरम्यान, चौघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी आरोपींनी अर्भकाचे उर्वरित शरीर कोठे पुरले याचा शोध घेणे आहे. आरोपी गीताबाई नंद हिची डीएनए तपासणी करणे बाकी आहे, त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT