sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : साडेचारशे अंगणवाड्या अद्यापही कुलूपबंद

दहा दिवसांपासून संप सुरु : बालक, स्तनदा माता आहारापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपामुळे पाचोडसह पैठण तालुक्यातील ४६२ अंगणवाड्या ओस पडल्या असून विविध बत्तीस हजारांवर बालकांसह गरोदर मातांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील पावणे पाचशेवर सेविका व साडे चारशेच्यावर मदतनीस संपात सहभागी झाल्या आहेत.

राज्यभर अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी किमान वेतन मिळावे या मागणीसाठी मंगळवारपासून (ता.५) अंगणवाड्याचे सर्व कामकाज बंद ठेवल्याने दहा दिवसांपासून सर्व अंगणवाड्या कुलूपबंद आहेत. अंगणवाडीसेविका, मिनीसेविका व मदतनीस बेमुदत संपावर गेल्याने लहान बालकांचा आहार बुडत आहे. या संपामुळे अनेक कुपोषित बालक आहारापासून वंचित राहत आहे. पाचोडसह पैठण तालुक्यात ४६२ अंगणवाडी व मिनी अंगणवाड्या असून एक हजारांच्या जवळपास अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ६१ मिनी अंगणवाड्या आहेत, तर ४०१ मोठ्या अंगणवाड्या आहेत.

प्रकल्प एक अंतर्गत २१० मोठ्या व ४१ मिनी अंगणवाड्या असून प्रकल्प दोन अंतर्गत १९१ मोठ्या तर २० मिनी अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्याचे जवळपास एक हजार कर्मचारी मंगळवारपासून (ता.पाच) बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. सध्या वाढती महागाई अन् तुटपुंजे मानधन यावर अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस काम करण्यास तयार नाहीत. त्यांना या तुटपुंज्या मानधनावर विद्यार्थ्यांना घरांतून घेऊन जाणे, त्यांना घरी सोडणे, दप्तरी रेकॉर्ड भरणे, ऑनलाइन माहिती भरणे, आहार देणे, गरोदर स्तनदा मातांच्या नोंदी घेणे, वरिष्ठांना माहिती देणे, तालुक्याच्या ठिकाणी मीटिंगसाठी जाणे आदी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

तालुक्यातील सर्व अंगणवाड्या बंद असल्याने कुपोषण बालकांचे अतोनात नुकसान होत असून त्यांना आहार मिळणे कठीण झाले आहे. हजाराच्या जवळपास अंगणवाडी कर्मचारी संपावर गेले असून यात मिनी सेविका मदतनीस यांचाही सहभाग आहे. अंगणवाड्यांच्या कामांत पूर्ण दिवस जातो. जबाबदारीमुळे घरच्या कामाकडे दुर्लक्ष करावे लागते. तुटपुंज्या मानधनात संसाराचा गाडा कसा चालवावा, हा आमच्यासमोर गंभीर प्रश्न आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून शासनाने मानधनात वाढ करावे, किमान वेतन व निवृत्तीवेतनासह इतर मागण्या मंजूर कराव्या.

- संगीता साखरे, अंगणवाडी कार्यकर्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT