arrest 
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक : शेतरस्त्यावरुन दोघा भावांवर केले कुऱ्हाडीने वार

सुषेन जाधव

औरंगाबाद : शेतात येण्या-जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरुन सात जणांनी दोघा भावांवर कुऱ्हाडीने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना २० एप्रिल रोजी दुपारी एक वाजता शरणापूर शिवारातील शेतात घडली. प्रकरणात पोलिसांनी तपास करुन मंगळवारी (ता.२२) रात्री आरोपींपैकी चौघांना अटक केली. गोपीचंद शिंदे (५९), विष्णु कान्हेरे (४८), संभाजी शिंदे (२७) व कल्याण कान्हेरे (१९, सर्व रा. शरणापूर ता. जि औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

प्रकरणात तुकाराम कान्हेरे (३५, रा. शरणापूर) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, शेतात येण्या-जाण्याच्या रस्त्यावरुन आरोपी रामकिसन कचरु कान्हेरे, उद्धव गोपीचंद कान्हेरे, नितीन विष्णू कान्हेरे, गोपीचंद शिंदे, विष्णू कान्हेरे, संभाजी शिंदे व कल्याण कान्हेरे यांनी तुकाराम कान्हेरे व त्यांच्या भाऊ ज्ञानेश्वर या दोघांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली.

तर आरोपी गोपींचद शिंदे व विष्णू कान्हेरे या दोघांनी त्यांच्या छातीवर व दंडावर कुऱ्हाडीने वार केले. व उर्वरित आरोपींनी लोखंडी गजाने शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली. प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिस कोठडीत रवानगी
चौघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींना शनिवारपर्यंत (ता.२५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जी. दुबे यांनी बुधवारी (ता.२२) दिले. सहाय्यक सरकारी वकील एल. डी. पागोरे यांनी आरोपींच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे आहे. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करणे बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navratri Day Four: आज नवरात्रीची चौथी माळ; धन-संपत्तीसह आरोग्याचे वरदान देणाऱ्या कुष्मांडा मातेची पूजा! पाहा नैवेद्य अन् मंत्र...

माजी IAS अधिकाऱ्याला अटक, ११९८ पदांच्या भरती प्रक्रियेत घोटाळ्याचा होता आरोप

EMI Rule: मेडिकल इमर्जन्सी किंवा पगार उशिरा आल्याने EMI चुकली? बँकेचे हे नियम माहीत आहेत का?

Maharashtra Live News : उघड्या चेंबरमध्ये पडला चिमुकला ; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Ratnagiri Electricity Demand October Heat : रत्नागिरीत 'ऑक्टोबर हीट'चा महावितरणला फटका; विजेची मागणी 180 मेगावॉटवर, तब्बल 38 कोटींची बिलं थकीत!

SCROLL FOR NEXT