girl harassed by relatives for having Hindu friend in chhatrapati sambhajinagar video goes viral  
छत्रपती संभाजीनगर

Video : धक्कादायक! हिंदू मुलासोबत फिरते म्हणून तरुणीचा भररस्त्यात मारहाण; व्हिडीओ पाहून संताप होईल अनावर

रोहित कणसे

छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादयक घटना घडली असून हिंदू मुलाबरोबर फिरते म्हणून एका तरूणीचा भररस्त्यात छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. महत्वाचे म्हणजे या तरुणीचा छळ करणारे तिच्या ओळखीतील असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेच्या व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील या व्हिडीओमध्ये काही तरूण भर रस्त्यात एका मुलीची छेड काढताना आणि तिला त्रास देताना दिसत आहेत. हे तीन ते चार तरुण मुलीला त्रास देताना, तिचा फोन हिसकावून घेताना तसेच अपशब्द वापरताना दिसत आहेत. या मुलीसोबत टवाळखोरी करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

वृत्तवाहिनी एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, सदर घटना ही २४ तारखेची असून हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या आई वडीलांनी हे अपापसातील प्रकरण असल्याचे सांगत याबद्दल तक्रार देण्यास नकार दिला.

सदर मुलगी तिच्या एका मित्राबरोबर फिरायला आली होती. यावेळी संबंधीत मुलीच्या ओळखीच्या तरुणांनी तिची रस्त्यावर छेड काढली. तसेच तो मुलगा कोण आहे अशी विचारणा करत तिला मारहाण करण्याच देखील प्रयत्न झाला. दरम्यान त्या मुलीसोबत असलेले मित्र मैत्रिणी निघून गेले. त्यानंतर या टोळक्याने मुलीचा पाठलाग करत तिला त्रास दिला.

आई-वडिलांचा तक्रार देण्यास नकार, पण…

या प्रकरणी मुलीच्या आई वडिलांनी तक्रार दिलेली नाहीये. मात्र पोलीस या घटनेचं गांभीर्य पाहाता तक्रार नोंदवू शकतात. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे तरूण त्या मुलीच्या ओळखीतील तसेच तिच्या घराच्या बाजूलाच राहाणारे असल्याचे सांगितले. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरच या प्रकरणात गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT