Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : शासकीय तंत्रनिकेतनमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : वाढदिवसानिमित्त झालेल्या शेरेबाजीचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. बाहेरच्या राजकीय कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात येत विद्यार्थ्यांना मारहाण केली असून, काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा प्रकार शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मंगळवारी (ता.28) सायंकाळी घडला. 

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला. यानंतर राजकीय कार्यकर्त्यांनी महाविद्यालय परिसरात येऊन विद्यार्थ्यांना मारहाण केली. लोखंडी गज, काठी, लाथा, बुक्‍क्‍यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याने यात तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्‍याला दुखापत झाली आहे. यातील एका विद्यार्थ्याच्या डोक्‍याला चार टाके पडले असल्याचे समजते. 

मारहाण करण्यासाठी आलेले तरुण चारचाकीतून महाविद्यालयात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मारहाण करणाऱ्यांमध्ये शहरातील बड्या राजकारण्यांचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. विद्यार्थ्यांच्या किरकोळ वादात राजकीय कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गुन्हा दाखल नाही

घटनेची माहिती कळताच, दोन्ही गटाचे राजकीय पदाधिकारी महाविद्यालयात आले. यातील एका गटाने प्राचार्यांची भेट घेत याबाबत तक्रार देण्याची मागणी केली. प्राचार्य एफ. ए. खान यांनी अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याचे पत्र वेदांतनगर पोलिस स्टेशनला दिले. पोलिस निरीक्षक रामेश्‍वर रोडगे यांनीही महाविद्यालयास भेट दिली; मात्र जखमी विद्यार्थ्यांनी पोलिसांत रीतसर तक्रार दिली नसल्याचे रोडगे यांनी सांगितले. 

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात झालेल्या मारहाणीच्या प्रकाराबाबत वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्‍वर रोडगे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मारहाण प्रकरणात अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही. तक्रार प्राप्त झाल्यास गुन्हा नोंदविण्यात येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT