Gram Panchayat Election Results Chapaner 
छत्रपती संभाजीनगर

बबनराव लोणीकरांच्या जावयांची हॅट्ट्रीक, चापानेवर ग्रामपंचायतीत किशोर पवारांच्या पॅनलचा पाचव्यांदा विजय

वाल्मिक पवार

चापानेर (जि.औरंगाबाद) : चापानेर(ता.कन्नड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  तथा आमदार बबनराव लोणीकर यांचे जावई जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार यांचे खोलेश्वर ग्रामविकास पॅनल सलग पाचव्यांदा विजयी मिळविला आहे. खोलेश्वर ग्रामविकास पॅनलमधील ११ पैकी दहा उमेदवार विजयी झाले असून एकूण उमेदवार अपक्ष निवडून आले आहे. चापानेर ग्रामपंचायत किशोर पवार यांच्या वडिलांच्या ही सलग वीस वर्षे ताब्यात होती.

वडिलांचा वारसा जोपासत जनतेची सेवा करत आणि केलेल्या कामाच्या बळावर या निवडणुकीत पुन्हा किशोर आबा पवार पॅनलचे उमेदवार निवडणुकीत उतरले होते. त्यांनी केलेली कामे पाणीपुरवठा विभागामार्फत पाच कोटीची पाईप लाईन, गावातील सिमेंट रस्ते, चापानेर गावात उभारलेले भव्य दिव्य अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, पाण्याच्या टाक्या स्मशानभूमी अशा अनेक विकासात्मक कामाच्या जोरावर त्यांनी यावेळी जनतेला आवाहन करून मतदान मागितले होते.

मतदारांनी देखील आजचा निकालात स्पष्ट बहुमत देत खोलेश्वर ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार यांनी मतदारांची जाहीर आभार व्यक्त केले. मतदारांनी निवडून दिल्याबद्दल हा विजय माझा एकट्याचा किंवा पॅनलचा नसून सर्व नागरिकांचा आहे. या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray’s Emotional Tribute to Dharmendra : ... पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी – राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!

Akola Crime : 'देवाभाऊ' अकोल्याच्या गुन्हेगारीकडे लक्ष द्या; नव्या गुन्हेगारी पॅटर्नचा होतोय उदय; रहस्यमय हत्यांनी पोलिसांसमोर कोडे!

Dharmendra Death: 'असं वाटतंय १० किलो रक्त कमी झालंय...' सचिन तेंडुलकरची धर्मेंद्र यांच्यासाठी भावूक पोस्ट

Sangli election: अर्ज माघारीनंतर शिराळा राजकारणात भूचाल! ‘निष्ठा विरुद्ध संधी’ संघर्षामुळे पक्षांतराची मोठी लाट उसळली

Latest Marathi News Live Update : शौर्य पाटीलच्या वडिलांचा आंदोलनात सहभाग

SCROLL FOR NEXT