Vaishnavi Hulsar And Aurangabad Accident Updates esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad| औरंगाबादेमधील अपघातात नातीचा मृत्यू, आजोबा गंभीर जखमी

ऐन उमेदीच्या वयात वैष्णवीवर असा प्रसंग ओढावल्याने अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण गावावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला.

संतोष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद ) : दुचाकीस अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. ही घटना करमाड- पिंप्रीराजा रस्त्यावर जडगाव फाट्याजवळ शनिवारी (ता.सात) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेतील तिघेही आजोबा, आजी व नात असे नातेसंबंधातील आहे. या अपघातात नात वैष्णवी भगवान हुलसार ( वय १५ ) ही मृत पावली, तर आजोबा आप्पासाहेब किसन हुलसार (५०) व त्यांच्या पत्नी मनकर्णाबाई आप्पासाहेब हुलसार (४५ , तिघेही रा. खोडेगाव, ता. औरंगाबाद) हे जखमी झाले. खोडेगाव येथून दुचाकीने (एमएच २० ईएस ८९७७) लाडसावंगीकडे जात असताना जडगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीस एका अज्ञात वाहनाने धडक दिली. (Grand Daughter Died, Grand Father Serious Injured In Accident In Aurangabad)

धडक जोराची असल्याने पंधरा वर्षीय वैष्णवी व आप्पासाहेब हुलसार यांच्या डोक्यास गंभीर ईजा पोहोचली, तर मनकर्णाबाई या किरकोळ जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. नागलोत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार चालू असताना सकाळी पावणेआठच्या सुमारास वैष्णवी हिचा मृत्यू झाला. श्री. हुलसार यांच्यावर डोक्याला गंभीर ईजा पोहोचल्याने उपचार सुरू आहेत तर मनकर्णाबाई यांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याचे बीट जमादार संतोष पाटील यांनी सांगितले. अपघाताबाबत औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटी रूग्णालयातील (Ghati) पोलीस चौकीतील खबरीवरून अज्ञात वाहनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनात जमादार श्री. पाटील पुढील तपास करीत आहेत.

गावावर पसरली शोककळा

या अपघातात जखमी झालेले एकाच कुटुंबातील व त्यात ऐन उमेदीच्या वयात वैष्णवीवर असा प्रसंग ओढावल्याने अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण गावावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. शवविच्छेदनानंतर दुपारी वैष्णवीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर खोडेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT