Grapes  esakal
छत्रपती संभाजीनगर

हिरडपुरीत द्राक्ष लागवडीचा प्रयोग यशस्वी, शेतकऱ्याच्या मेहनतीला मिळाले फळ

पिक व्यापाऱ्यांना विक्री न करता किरकोळ बाजारात विक्री

सकाळ वृत्तसेवा

विहामांडवा (जि.औरंगाबाद) : पैठणमधून गोदावरी नदी वाहत असल्याने तालुक्यातील बहुतांश भागात ऊस लागवडीचे प्रमाण अधिक आहे. यासह बहुतांश शेतकरी मोसंबी, डाळिंब आदी पिकांनाही पसंती देतात. मात्र, हिरडपुरी येथील बळिराजाने येथील पारंपरिक पिकांना फाटा देत अथक मेहनतीच्या बळावर द्राक्ष लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. तालुक्यातील हिरडपुरी येथे पारंपरिक पिके न घेता महादेव जाधव, बळिराम जाधव या दोन भावांनी शेतात वेगळे पीक घेण्याचे ठरवले. यानंतर त्यांनी विविध पिकांची माहिती घेतली असता यातून त्यांनी द्राक्ष पीक लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दीड एकर क्षेत्रावर द्राक्ष पिकांची लागवड केली. यात एकूण तेराशे झाडांची लागवड झाली असून जाणकार शेतकऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शनही घेतले. (Grapes Cultivation Successful In Paithan Taluka Of Aurangabad)

औषध फवारणी, खत यांची योग्य निगा करीत सुमारे सात लाखांपर्यंत खर्च केला. अर्थात, त्यांच्या मेहनतीला फळही मिळाले. एका झाडावर जवळपास दहा ते बारा किलो द्राक्षे निघत आहे. दीड एकर क्षेत्रात १५ ते १८ टन द्राक्ष निघणे अपेक्षित आहेत. व्यापाऱ्यांनी ही द्राक्षे १६ रुपये प्रतिकिलोप्रमाणे मागितली होती. परंतु जाधव बंधूंनी कपाशी व्यापाऱ्यांना द्राक्षे न देता किरकोळ विक्रेते, फेरीवाले नवयुवकांना थेट विक्री केल्याने त्यांच्या द्राक्षाला चांगला भाव मिळू लागला आहे. तसेच विक्रेत्यांना देखील त्याचा फायदा होऊ लागला आहे.

म्हणून लागली होती चिंता

पैठण (Paithan) तालुक्यातील शेतकरी साधारणतः कपाशी, ऊस, मोसंबी व काही नगदी पिकांची लागवड करतात. परंतु हिरडपुरी येथील जाधव शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिकांना बाजूला करून प्रथमच द्राक्ष लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. अर्थात, हा प्रयोग करताना या भागातील वातावरण पिकाला साथ देईल का, लागवडीला खर्च किती लागेल, याचा अंदाज नव्हता. परंतु, केलेल्या परिश्रमाचे चीज झाले असून याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

किरकोळ विक्रेत्यांना द्राक्ष विक्री

जाधव शेतकरी बांधवांनी आतापर्यंत सुमारे सात टन द्राक्षांची विक्री केली आहे. येत्या काळात द्राक्षांची आवक सुरुच राहणार आहे. द्राक्ष (Grapes) लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्याने या भागातील अनेक शेतकरी द्राक्ष लागवडीकडे वळू शकतात. व्यापाऱ्यांना माल देण्यापेक्षा स्वतः विक्री केला तसेच किरकोळ विक्रेत्यांना द्राक्षे दिल्याने त्यांनाही याचा फायदा झाला. (Aurangabad)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू! एसटीला पसंती, बसस्थानकांवर प्रचंड गर्दी

Rohit Sharma: One Last Time! रोहितने सिडनीतून केलं ऑस्ट्रेलियाला अलविदा, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : मालाडमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर फावड्याने हल्ला

Chhattisgarh Naxalite Surrender : छत्तीसगडमध्ये या वर्षांत तब्बल दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण!

Fraud Case: एपीएमसीत विमा फसवणूक प्रकरण उघड! नावसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन पॉलिसी रक्कम लाटली

SCROLL FOR NEXT