CoronaVirus 
छत्रपती संभाजीनगर

हर्सूल कारागृहात कोरोना पसरल्याच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी

सुषेन जाधव

औरंगाबाद: हर्सूल कारागृहातील २९ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या पीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेत प्राथमिक सुनावणीसाठी १६ जूनला ठेवली आहे.

हर्सूल कारागृहात हत्येच्या गुन्ह्यात चार महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याला २१ मे रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. या वृत्ताला पोलिस प्रशासनाकडून दुजोरा मिळाला होता; मात्र कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी आमच्याकडे कोणताही कैदी हा कोरोनाबाधित नसल्याचा दावा केला होता. या प्रकरणात अमायकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून ॲड. संगीता तांबट-धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली. शासनातर्फे सरकारी वकील ॲड. डी. आर. काळे काम पाहत आहेत.

हत्या प्रकरणातील एका आरोपीला २० मे रोजी अस्वस्थ वाटत असल्याने आणि त्याला कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने ‘घाटी’त दाखल केले होते. यावेळी त्याचा स्वॅब घेण्यात आला. यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. चाचणी घेतल्यानंतरही संशयित कैद्याला अलगीकरणात न ठेवता त्याला कैद्यांच्या बराकीमध्ये ठेवले गेले.

२१ मे रोजी या बंदीवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तरी कारागृह प्रशासनाने आमच्याकडे कोणताही बंदीवान हा बाधित नसल्याचा दावा केला होता. तो दावा आता महागात पडल्याचे वृत्त होते. कारागृह अधीक्षकांनी यासंबंधीची माहिती लपविण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. नंतर जेव्हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधीक्षकांनी आपली भूमिका बदलली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लावलेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT