Holidays For Doctors And Police at Vaijapur dist Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

डॉक्टर-पोलिसांना सुटी; राजकीय नेते झाले पोलिस, वाचा कुठे...

भानुदास धामणे

वैजापूर (जि. औरंगाबाद) ः कोरोनाला हरविण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पोलिस यांना दोन दिवस विश्रांती देण्याचा उपक्रम आमदार प्रा. रमेश बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या पुढाकाराने शनिवारी (ता. नऊ) वैजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात राबविण्यात आला. त्यासाठी नगर परिषदेसह तालुका महसूल प्रशासनानेही सहकार्य केले.

रविवारीही (ता. दहा) हा उपक्रम राबवून या तिन्ही घटकांना विश्रांती देण्यात येणार आहे. आमदार बोरनारे उपविभागीय पोलिस अधिकारी बनले असून, डॉ. परदेशी हे पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक म्हणून उपनगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप यांनी जबाबदारी सांभाळली. 

नियोजनानुसार दवाखाने, औषधी दुकाने वगळता वैजापूर शहर, ग्रामीण भाग शंभर टक्के बंद (लॉकडाउन) ठेवण्यात आला. सर्व पोलिस कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांनी कामावर न येता विश्रांती घेतली. डॉ.भांड, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. उद्धव सोनवणे, डॉ. नितीन बोरनारे, डॉ.शिंदे, डॉ. मोहन यांच्यासह इतर खासगी डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज मोफत सेवा दिली. रविवारीही ते सेवा देणार आहेत. 

तपासणी नाक्यावर बंदोबस्त 

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही विश्रांती देऊन त्यांच्या जागी तपासणी नाक्यावर, चौफुलीवर राजकीय नेते, अधिकाऱ्यांनी स्वतः स्वयंसेवकांची भूमिका बजावली. त्यात तहसीलदार महेंद्र गिरगे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल डाके, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, भाऊसाहेब गलांडे, प्रशांत कंगले, स्वप्नील जेजुरकर, गणेश खैरे, दिनेश राजपूत, दशरथ बनकर यांचा समावेश होता.

त्यांनी बंदोबस्त ठेवत प्रत्येक वाहनाची तपासणी केली. प्रत्येक वॉर्ड, सर्कलनुसार बिट अंमलदार, पोलिस कॉन्स्टेबलची सोपविण्यात आलेली जबाबदारी अशी. येवला नाका-राजेंद्र साळुंके, डॉ. नीलेश भाटिया, लिमेश बापू वाणी, शैलेश चव्हाण, निखिल वाणी, संतोष वाघ, गणेश वाणी, शंकर मुळे. गंगापूर चौफुली- ज्ञानेश्वर टेके, विशाल संचेती, पारस घाटे, प्रकाश छाजेड, परेश भोपळे नांदगाव- मोहन साळुंके, महेश बुनगे, राजू गायकवाड, सावळीराम गाढे, कमलेश आंबेकर. सुराळा- बंडू जगताप, बंडू गायकवाड, सचिन गडाख, सावखेडगंगा- कल्याण जगताप, नानासाहेब थोरात, काशीनाथ रक्ताटे, महालगाव- अविनाश गलांडे, डॉ. प्रकाश शेळके, सीताराम भराडे, संभाजी डांगे, भीमाशंकर तांबे, तलवाडा- गोरख आहेर, भिकन सोमासे, अंबादास खोसे, सर्जेराव काका, शिऊर- बबनतात्या जाधव, नंदू जाधव, प्रभाकर जाधव. लासूरगाव- मनाजी मिसाळ, संभाजी जगताप, प्रवीण सोनवणे, किशोर हुमे, बबनकाका हरिचंद्रे, पप्पू हुमे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण करण्याचे संस्कार आम्हा शिवसेना कार्यकर्त्यांवर केले आहेत. त्या भावनेतूनच हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

प्रा. रमेश बोरनारे, आमदार  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: नाराज इच्छूकांनी अर्ज माघारी घ्यावेत- हसन मुश्रीफ

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT