Aurangabad news 
छत्रपती संभाजीनगर

दुभत्या जनावरांना कसे सांभाळावे?

प्रकाश बनकर

औरंगाबाद, : कोरोनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतमालापासून ते फळापर्यंत सर्वच माल पडून आहे. यात अधिक हाल होत आहे ते दूध उत्पादक शेतकऱ्यांचे. दुभत्या जनावरांना लागणाऱ्या खाद्याचे दर हे दुधापेक्षा जास्त असल्याने जनावरांना संभाळाचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुखाद्याचे दर कमी करावे, अशी मागणी शेतकरी आणि जिल्हा दूध संघातर्फे खाद्य निर्मित करणाऱ्यांकडे करण्यात आली. 

जिल्ह्यात गाय व म्हशींची एकूण संख्या ६ लाख ७६ हजार १८० आहेत. एका दुभत्या जनावराला १० लीटर मागे तीन ते चार किलो पशुखाद्य लागते. म्हणजेच एका जनावरास महिन्याकाठी १०० किलो खाद्य द्यावे लागते. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना हा खर्च परवडत नाही. खासगी दूध संघाने संकलन बंद केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर दूध शिल्लक राहात आहेत. जिल्हा दूध संघाकडून संकलन सुरू आहे; मात्र शेतकऱ्यांना पशुखाघ डोईजड होत आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन पशुखाद्याचे दर कमी करावेत, अशी मागणी होत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्हा दूध संघाचे कंपन्यांना पत्र 
राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे पशुखाद्याचे दर कमी करावे, असे पत्र जिल्हा दूध संघाने कंपन्यांना दिले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

  • शहर व जिल्ह्याला लागणारे दूध (रोज) 
  • शहर------५ ते ६ लाख लीटर 
  • जिल्हा------ १० ते १२ लीटर 
  • जिल्ह्यातील पशुधन (२०१२ मधील पशुगणेनुसार) 
  • गाय------- ५ लाख ८२ हजार ६५९ 
  • म्हैस------९३ हजार ५२१ 
  • बकरी----- ३ लाख ३० हजार १३ 
  • मेंढी------- ८८ हजार २१९ 
  • सध्या दूध देणारे पशू 
  • गायी व म्हैस--- १ लाख २० हजार 

सद्यःस्थितीत दुभते पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. यामुळे खाद्य कंपन्यांनी पशुखाद्याचे दर कमी करीत शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. 
- नंदलाल काळे, उपाध्यक्ष, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

SCROLL FOR NEXT