वाळूज (जि.औरंगाबाद) - अपहरण झालेल्या चिमुकल्यासह आरोपी. 
छत्रपती संभाजीनगर

आईची पोटच्या गोळ्यासाठी पळापळा, पित्यानेच केले बाळाचे अपहरण

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : सततच्या मारहाणीमुळे माहेरी निघालेल्या पत्नीला रस्त्यात अडवून मारहाण करत तिच्या जवळचे तीन महिन्यांचे बाळ हिसकावून त्याचे पित्यानेच अपहरण केले. या प्रकारानंतर घाबरलेल्या पत्नीने नातेवाईक व पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसर पिंजून काढला. आईचे काळीज पिळवटून काढणारा हा प्रकार शनिवारी (ता.२१) वाळूज (Waluj) परिसरात घडला. भिंगार (ता. जि. नगर) (Ahmednagar) येथील अपर्णा गाडेकर (वय १८) हिचे गेल्या काही दिवसापूर्वी अपहरण करून आरोपी संदीप दिलीप कदम (२६, रा. डोंगरगण ता.जि.नगर) याने तिच्याबरोबर लग्न केले. आंतरजातीय लग्न (Aurangabad) असल्याने त्याला नातेवाईकांचा (Crime Against Woman) विरोध होताच. तरीही अपर्णा ही पती संदीप सोबत सुखी संसाराचे स्वप्न रंगवित होती. संदीप हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्याविरोधात नगर जिल्ह्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सतत चकरा सुरु झाल्याने अपर्णा त्रस्त झाली होती. तीन महिन्यांपूर्वी तिने बाळाला जन्म दिला. त्याचे नाव सिध्दार्थ असे ठेवण्यात आले.

मुलाचा जन्म झाल्यानंतर संदीप हा पत्नी व मुलाला सोबत घेऊन वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे आला. तो परिसरात गवंडी काम करू लागला. दरम्यान, दोघांमध्ये वाद होत असल्याने संदीप पत्नी अपर्णा हिला मारहाण करत असे. सततच्या मारहाणीला कंटाळून अपर्णा हिने दोन दिवसांपूर्वी माहेरी फोन करून मला माहेरी घेऊन जा, असे सांगितले. यानंतर अपर्णाची आई सुजाता गाडेकर व आजी यांनी रांजणगाव येथे येऊन मुलगी अपर्णाची भेट घेतली. त्यानंतर अपर्णा ही त्यांच्यासोबत शनिवारी (ता.२१) सिद्धार्थला सोबत घेऊन माहेरी जात असल्याने समजताच संदीपने रांजणगाव फाट्याजवळ रिक्षा अडविला. त्याने पत्नी अपर्णाला मारहाण करुन सिध्दार्थला हिसकावून घेत पळ काढला.

या प्रकारानंतर अपर्णा हिने आई व आजी यांना सोबत घेऊन वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी आरोपीच्या शोधार्थ सहायक पोलीस निरीक्षक एम.आर.घुनावत, पोलिस उपनिरीक्षक राहुल निर्वळ यांचे पथक रवाना केले. त्यांनी परीसर पिंजून काढला. मात्र तो कुठेही मिळून आला नाही. दरम्यान अपर्णाची आजी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिवसभर बसून होती. तर पोलिस पथक, अपर्णा व तिची आई अपहरणकर्त्या आरोपीचा व चिमुकल्या बाळाचा शोध घेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Petrol Explosion: पेट्रोलच्या भडक्यात भाजलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Sharad Pawar : शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली चुकीची, शरद पवार यांचे मत; सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा

SCROLL FOR NEXT