संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

थर्मलगन, ऑक्सिमीटर नाही तर दुकान बंद!

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - लॉकडाउन शिथिल करण्यात आल्याने शहरातील बाजारपेठा येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती असून, त्यासाठी शहरातील सर्व आस्थापनांना थर्मलगन आणि ऑक्सिमीटर ठेवणे व त्या माध्यमातून दुकानात येणाऱ्या नागरिकांची नियमित तपासणी करणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी (ता. एक) सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना काढले आहेत. 

काय म्हणाले प्रशासक? 
शहर रेड झोनमध्ये असले तरी कन्टेनमेंट झोन वगळता बाजारपेठा सुरू होणार आहेत. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर श्री. पांडेय यांनी आदेश काढले. यात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करणे आवश्यक आहे. तशी खबरदारीही आम्ही घेत आहोत. उपाययोजना करून काही आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेत आहे. महापालिकेमार्फत ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ या अॅपच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे. मात्र, महापालिकेच्या टीम सर्व शहरात सतत जाऊ शकणार नाहीत, तसेच ऑक्सिमीटर सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व आस्थापनांना थर्मलगन व ऑक्सिमीटर ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व दुकानदारांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

कारवाईचा इशारा 
ऑक्सिमीटर व थर्मलगन दुकानांमध्ये ठेवण्यासंदर्भात वॉर्ड अधिकाऱ्यांना काढण्यात आलेल्या आदेशात दुकाने चालविण्यासाठी नियुक्त कर्मचारी व विविध कामांसाठी येणारे व्यक्ती-ग्राहक यांची थर्मलगन व ऑक्सिमीटरने तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या आस्थापना थर्मलगन व ऑक्सिमीटर ठेवणार नाहीत अशा आस्थापनांना व्यवसाय चालू करण्यास परवानगी असणार नाही, अशी तंबी प्रशासकांनी दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Blow : संजू सॅमसन चालू सामना सोडून मैदानाबाहेर गेला, CSK ला दुसरा यष्टिरक्षक उभा करावा लागला... फलंदाजीला येणार की नाही?

Pune University Food Safety: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अन्न सुरक्षेचा बोजवारा; कॅन्टीनमधील पोह्यांमध्ये पुन्हा अळी, विद्यार्थ्यांचा संताप

World Record : मुंबई इंडियन्सने मोडला पाकिस्तानचा विश्वविक्रम; IPL फ्रँचायझींमध्येही सर्व आघाड्यांवर टॉपर...

Jaysingpur Killing Case : जयसिंगपुरात भरदिवसा तरुणाचा खून; मित्रानेच केला ‘गेम’, शहरात खळबळ

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात अंबाजोगाईतील भावंडांची सीबीआयकडून गुप्त चौकशी; लातूरमधील मोठ्या रॅकेटचे धागेदोरे

SCROLL FOR NEXT