कामगार 
छत्रपती संभाजीनगर

कोंबलेल्या मजुरांची सुटका, मिळणार आणखी चांगल्या सुविधा

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - ‘सकाळ’मध्ये दोन एप्रिलच्या अंकात ‘शाळा खोल्यांत कामगारांची कोंबाकोंबी’ हे वृत्त प्रकाशित झाले होते. परराज्यातील मजुरांबाबतच्या त्या वृत्ताची दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो दाखल केली. त्यानंतर प्रशासनाने हालचाली गतिमान करीत त्या ४४ जणांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला; मात्र आणखी चांगल्या सुविधा देण्यात येतील, असे सांगत प्रशासनाने त्यांना शनिवारी (ता. चार) रात्री नऊनंतर निपाणीच्या शरदचंद्र पवार तंत्रनिकेतन महाविद्यालयात हलविले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सुसज्ज वसतीगृहात हलविले
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर मजुरांना औरंगाबादेत अडविण्यात आले. त्या मजुरांना गारखेडा परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत ठेवले होते. कुठल्याही भौतिक सुविधा देण्यात आल्या नव्हत्या. यातले तीन मजूर आजारी असल्यामुळे बाकीच्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर महापालिकेच्या शाळेत आणखी खोल्या वाढवून सुविधा देण्याचा प्रयत्न केला होता. लॉकडाऊन आणखी दहा दिवस आहे. त्यानुसार, १४ एप्रिलपर्यंत त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था निपाणी येथील शरदचंद्र तंत्रनिकेतन महाविद्यालयात करण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांचे शनिवारी रात्री दोन टप्प्यांत पोलिस वाहनाने स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे चांगल्या प्रतीचे वसतिगृह आहे. तिथे त्यांना चांगल्या सुविधा दिल्या जाणार आहेत. महाविद्यालयात पलंग, अंथरुण, पांघरुण, स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोण आहेत ते मजूर... 
मध्य प्रदेशला गावी निघालेल्या १४ जणांना पोलिसांनी वाळूज-पंढरपुरात, तर जळगावहून सांगलीकडे निघालेल्या २२ लोकांना हर्सूल येथे पोलिसांनी अडवले होते. यासह अजून दहा ते बारा भटक्यांना पकडून त्यांची रवानगी गारखेडा येथील महापालिकेच्या शाळेत केली होती. तिथून त्यांनी पलायन करू नये म्हणून शाळेच्या गेटला कुलूप लावण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT