Imtiaz Jaleel 
छत्रपती संभाजीनगर

मुंगेरीलाल निर्मला सीतारामन यांचे हँसीन सपने, इम्तियाज जलील यांची अर्थसंकल्पावर टीका

ई सकाळ टीम

औरंगाबाद : मुंगेरीलाल निर्मला सीतारामन यांचे हँसीन सपने अशी पहिली प्रतिक्रिया केंद्रीय अर्थसंकल्पावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी बोलताना आज सोमवारी (ता.एक) दिली. असे वाटत आहे, की या देशात कोणत्याही समस्या राहिलेल्या नाहीत. देशामध्ये फक्त विकासाची गंगा वाहत आहे.हे ऐकायला बर वाटत होते. पण खऱ्या अर्थाने जे इनर पाॅईन्ट्स  आहेत  ते कसे  करणार ते किती शक्य आहे हे कळायला मार्ग नाही.  जे आकडे दाखविण्यात आले आहे, ते एक सोप म्हणजे या देशाला त्यांनी (सरकारने) विकायला काढले आहे, अशी घणाघाती टीका जलील यांनी केली आहे. 

येणाऱ्या काळामध्ये कोणीचीही जाॅब गॅरंटी राहणार नाही. जे  खासगी क्षेत्रात लोक येतील सरकारी कंपन्या खासगी कंपन्या घेतील ते कशासाठी त्यांना ठेवतील?  हा प्रश्न निर्माण झाला आहे. अजुन आपल्याकडे दररोज बेरोजगारी वाढत आहे. त्यात भर पडणार आहे. यात दुमत नाही, असे मला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.  ज्यांनी म्हटल स्वच्छ भारत, सुंदर भारत, परवडणारी घरे हे ऐकायला इतक बर वाटत, की मी मागच्या काही वर्षांमध्ये बघितले आहे.

हाॅस्पिटलमध्ये बेड्स नाही. जिथे ती आहेत तिथे डाॅक्टर नाहीत. डाॅक्टर आहेत तिथे औषधे नाहीत. यामुळे लोक मेले आहेत. त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. आज बजेट सादर केले गेले. लोकांना सोप्या भाषेत सांगायला हवे होते. बजेट सादर करण्याच्या वेळेस विशेषतः भाजप खासदारांनी दर दोन मिनिटांनी टाळ्या वाजवायला सांगितले होते, असे खासदार जलील यांनी उपहासात्मक टीका केली. या बजेटमधून काही साध्या होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: शत्रूपक्षातील सौहार्द! संजय राऊतांची प्रकृती बिघडली; नरेंद्र मोदींचा ‘गेट वेल सून’ संदेश, खासदारांनी दिलं भावनिक उत्तर

चुकीचे काम करावे, नोकरी सोडावी म्हणून ‘फायनान्स’मधील तरुणीचा विनयभंग, छळ! ब्रॅंच मॅनेजर, सेल्स मॅनेजर, एरिया क्रेडिट मॅनेजर, लिगल हेडसह १० जणांवर गुन्हा

Kannad News : कन्नड नगरपरिषदेच्या विकासकामांसाठी ९ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर

Boisar Fire : बोईसरमधील कार्पेट कारखान्याला आग; चार कामगार गंभीर जखमी

Women’s World Cup 2025 Prize Money : वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाला किती कोटींचं बक्षीस मिळणार? ICC ने केलीय मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT