Auranagabad News 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर ‘अमेझिंग औरंगाबाद’कडे देणार लक्ष -सुभाष देसाई

प्रकाश बनकर

औरंगाबाद : जगभरातील मोठी गुंतवणूक डीएमआयसीच्या ऑरिक सिटीत आणण्यासाठी शासनातर्फे मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या धर्तीवर ‘अमेझिंग औरंगाबाद’चा नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्य शासन, डीएमआयसी आणि सीएमआयए आणि इतर औद्योगिक संघटनांना एकत्र करून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

यातून उद्योगांना औरंगाबादेत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याच उपक्रमासंदर्भात उद्योग संघटनांनी शुक्रवारी (ता.१४) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. याविषयी आपण आग्रही आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर याकडे पूर्ण क्षमतेने लक्ष दिले जाईल, असे आश्‍वासन श्री. देसाई यांनी संघटनांना दिले. 

सहा महिन्यांपासून या उपक्रमाचे नियोजन सुरू होते. सीएमआयए व संबंधित अधिकाऱ्यांच्या याविषयी बैठका झाल्या. मात्र, कोरोनामुळे काम मागे पडले. या उपक्रमातून प्रदर्शने, सेमिनार अशा विविध माध्यमांचा उपयोग केला जाणार आहे. नव्या उद्योगांसाठी ऑरिक सिटीत दहा हजार एकर जागा तयार आहे. याच ऑरिक सिटीतून शेंद्रा-बिडकीन कॉरिडॉर हा भव्य प्रकल्प २५ हजार एकरांवर उभा राहणार आहे. त्यापैकी दहा हजार एकर जागेचे अधिग्रहण झाले असून, पुढील कामे सुरू आहेत.

बिडकीन आणि शेंद्रा येथे उद्योगांना लागणाऱ्या बहुतांश सुविधांचे काम पूर्ण झाले आहे. त्याचेच दर्शन ‘अमेझिंग औरंगाबाद’मधून मांडण्यात येणार आहे. हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी शुक्रवारी सीएमआय व इतर संघटनांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. यातून नवीन उद्योग आणण्यासाठी हा उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे.

यानुसार कोविडचा संसर्ग कमी झाल्यावर याकडे लक्ष देण्यात येईल, असेही श्री. देसाई यांनी सांगितले. यावेळी सीएमआयएचे अध्यक्ष कमलेश धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, सुयोग माच्छर, सहसचिव प्रीतेश चटर्जी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

PG Medical Courses: आरोग्य विद्यापीठाचे पीजी प्रवेश सुरू; तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जासाठी १३ जुलैपर्यंत मुदत

Space Technology Agriculture: स्पेस टेक्नोलॉजीमुळे शेतीत होईल क्रांती! इस्रो शिकवणार उपग्रहांचा शेतीमध्ये उपयोग, आजच करा अर्ज!

संगमनेर हादरलं! 'भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू'; ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT