bjp Jan Aashirwad Yatra bjp Jan Aashirwad Yatra
छत्रपती संभाजीनगर

Jan Aashirwad Yatra: भाजपचे औरंगाबादेत ‘जनशक्तिप्रदर्शन’

जालना जिल्ह्यापासून यात्रेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सहभागी झाले. भाजपतर्फे यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती

प्रकाश बनकर

जालना जिल्ह्यापासून यात्रेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सहभागी झाले. भाजपतर्फे यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती

औरंगाबाद: मराठवाड्यातून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली निघालेली जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी (ता.२०) दुपारी औरंगाबादेत दाखल झाली. यात्रेच्या माध्यमातून भाजपने शहरभर मोठे शक्तिप्रदर्शन केले. यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारीही प्रत्येक चौका-चौकात करण्यात आली होती. शहरातील सर्वच भागात ही यात्रा गेली. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन केले. ता. १६ ऑगस्टपासून निघालेली ही जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी जिल्ह्यात दाखल झाली. जालना जिल्ह्यापासून यात्रेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सहभागी झाले. भाजपतर्फे यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.

केंब्रिजपासून निघालेल्या यात्रेत युवा मोर्चातर्फे वाहन रॅली काढण्यात आली. त्यानंतर यात्रेत आमदार हरिभाऊ बागडे, यात्रासहप्रमुख आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, भगवान घडामोडे, राजू शिंदे, अनिल मकरिये, प्रमोद राठोड, सुहास शिरसाट, आबा पाटील, प्रवीण घुगे, शिरीष बोराळकर, राम शेळके, राधाकिसन पठाडे यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक ठिकाणी महापालिकेसाठी भाजपकडून इच्छुक असलेल्यांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. सिडकोतील वसंतराव नाईक चौकात यात्रा आल्यानंतर बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक नृत्य करीत यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर ही यात्रा शहरातील विविध भागांत गेली.

स्वागतासाठी अन् बॅनरसाठी क्रेनचा वापर
यात्रेच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी चौका-चौकात क्रेनच्या माध्यमातून नेत्यांच्या स्वागतासाठी भली मोठी माळ अन् बॅनरबाजी केली. शहरात सर्वच ठिकाणी क्रेनचा वापर भाजपतर्फे करण्यात आला होता. त्यामुळे विविध ठिकाणी क्रेनमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. उत्साही कार्यकर्ते व रस्त्यावरील या कार्यक्रमांमुळे कामगार-कर्मचारी व खरेदीसाठी मार्केटमध्ये जाणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी दुसऱ्या रस्त्याने जाणे पसंत केले, मात्र अनेकांनी राजकारण्यांच्या या शक्तिप्रदर्शनाला कंटाळून नाराजी व्यक्त केली आहे. सर्वच ठिकाणी जवळपास अर्धा ते एक तास वाहतूक खोळंबली होती. खुद्द मंत्र्यांनीच मास्कच वापर केला नाही. फिजिकल डिस्टन्सचा पुरता फज्जा यात्रेत उडाला.

औरंगाबादच्या विकासाला प्राधान्य: डॉ. कराड
जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून सात लोकसभा आणि ३० विधानसभा मतदारसंघांतून जवळपास एक हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. सर्वत्र यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद शहराचे प्रश्‍न काय आहे हे मला चांगले माहीत आहे. शहराच्या पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यटन याचीही काय स्थिती आहे हे माहिती आहे. शहरात आठ दिवसांनंतर पाणी येते, १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्‍घाटन मुख्यमंत्र्यांनी केले असले तरी त्यात पाहिजे तसे काम झालेले नाही. यामुळे यावरही लवकरच आढावा बैठक घेणार आहे. शहराच्या विकासाबरोबर मराठवाड्याच्या विकासाला प्राधान्य असेल. लवकरच सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येतील, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणार: दानवे
औरंगाबाद महापालिकेचा केंद्र सरकारने स्मार्ट सिटीत समावेश केल्यामुळे विकास झाला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, भाजपचे सर्व पदाधिकारी एकत्रित काम करीत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यात्रेदरम्यान वसंतराव नाईक चौकात झालेल्या कार्यक्रमात सांगितले. रावसाहेब दानवे म्हणाले, की सध्या शहर परिसरात जे रस्ते, पुलाचे कामे व गावागावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू आहे, त्या केंद्र सरकारचा योजना आहेत. या योजनांमुळे औरंगाबादचा वेगाने विकास झाला आहे. यामुळेच महापालिकाही नक्कीच भाजपच्या ताब्यात येईल, असा विश्‍वासही मंत्री दानवे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT