Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद ठेवा !

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : राज्यातील विविध धार्मिक स्थळे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांनी स्वत:हून भाविकांना दर्शनासाठी मंदिरे व देवस्थाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असलेली सर्व धार्मिक स्थळे नियमित पूजा-अर्चा व धार्मिक विधी वगळता भाविकांसाठी पुढील दोन आठवडे दर्शनास बंद ठेवल्यास संसर्ग कमी होण्यास मदत होईल, असे आवाहन धार्मिक संस्थांना करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने सांगितले, की देवस्थान परिसरात भाविकांची गर्दी होणार नाही आणि संभाव्य कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. यादृष्टीने आवश्यक सर्व खबरदारीच्या उपाययोजना आपल्या स्तरावर करण्यात याव्यात.

तसेच कोविड-१९ रोगाचा प्रसारही आपत्ती घोषित झाल्यामुळे अशा आपत्तीसदृश परिस्थितीत सर्व मशिदींमधून किमान पुढील दोन आठवडे एकत्रित नमाज अदा करण्याऐवजी घरीच नमाज अदा करण्याबाबत आवाहन केल्यासही लोक एकत्रित होण्यापासून परावृत्त होऊन रोगाचा संसर्ग टाळता येऊ शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तरी याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आवाहन सर्व उलमा/पेशमाम/मौलवी यांना करण्यात येत आहे. चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार तसेच इतर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे या ठिकाणीही अत्यावश्यक धार्मिक कार्य वगळता, किमान पुढील दोन आठवडे लोक एकत्रित येऊ शकतील असे सर्व कार्यक्रम टाळण्याचे आवाहन सर्व धर्मगुरूंना करण्यात आले आहे. 
हेही वाचा : मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश 
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये दिनांक ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले असून, जिल्ह्यात जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आलेले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळेदेखील सात एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. सर्व स्थानिक जत्रा-यात्रांनासुद्धा परवानगी देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT