Aurangabad Khandoba Yatra 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत खंडोबा यात्रेला सुरवात, भाविकांनी घेतले दर्शन

संदीप लांडगे

औरंगाबाद : येथील सातारा परिसरातील खंडोबा यात्रेला रविवारी (ता. २०) सुरुवात झाली. सकाळी सव्वा सात वाजता महाआरती झाल्यानंतर खंडोबा मूर्तीची पालखी काढण्यात आली. त्यानंतर दिवसभर पालखी भाविकांच्या दर्शनासाठी दांडेकरांच्या वाड्यात ठेवण्यात आली होती. रविवारी कोरोनाच्या नियमांचे पालन करत भाविकांनी दर्शन घेतले. रविवारी चंपाषष्ठीला मार्तंड भैरवोत्थापन होत असल्याने यात्रेला सुरवात झाली. त्यानिमित्ताने खंडोबा मंदिरात पुजारी दिलीप धुमाळ, विजय धुमाळ, विशाल धुमाळ यांच्या हस्ते मध्यरात्री लघुरुद्र अभिषेक करण्यात आला.

त्यानंतर खंडोबा मूर्तीच्या महापूजेला करण्यात आली. सकाळी सहा वाजता खंडोबाला वांग्याचे भरीत-बाजरीचा रोडगा व पुरणपोळीसह १०१ पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आले. सकाळी सव्वासात वाजता १५ जणांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. सकाळी आठ वाजता मूर्तीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दिवसभर ही पालखी भाविकांच्या दर्शनासाठी दांडेकरांच्या वाड्यात विश्रांतीसाठी ठेवण्यात आली होती. रात्री आठ वाजता खंडोबाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून मंदिरात आणण्यात आली.

रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. कोरोना संसर्गामुळे यंदाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी नियम पाळून खंडोबा मंदिरात महाआरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत होता. तीन दिवसीय यात्रेची मंगळवारी (ता.२२) सांगता होणार आहे. भाविकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन देवस्थान संस्थानचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे, विश्वस्त दिलीप दांडेकर, विठ्ठल देवकर, गोविंद चोपडे, रमेश चोपडे, लक्ष्मण चोपडे, लक्ष्मण सोलाट, श्रीधर झरेकर, गणेश खोरे, सुभाष पारखे, मोहन पवार, सुखदेव बनगर, विजय धुमाळ, सिंधूताई धुमाळ आदींनी केले आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAY: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! फ्री रेशन योजनेत मोठा बदल; आता 'या' कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो धान्य मिळणार

घरच्या घरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची शेती... जुही चावलाने घरातच तयार केलं मिनी फार्म

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

India vs Ireland सामन्याची वेळ बदलली; नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार? कारण काय तर

SCROLL FOR NEXT