file photo 
छत्रपती संभाजीनगर

महापालिकेची पाच वर्षाची तयारी का गेली वाया ...वाचा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद  : महापालिकेतील नोकरभरती अनेक वर्षांपासून रखडली आहे. आकृतिबंधाचे गुऱ्हाळ गेल्या पाच वर्षांपासून सुरूच आहे. वारंवार अभ्यास करून तयार करण्यात आलेला आकृतिबंध व सेवाभरती नियमांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र तो विभागनिहाय नसल्याने शासनाने परत पाठविला असून, नव्याने दुरुस्ती करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. 

महापालिकेचा व्याप वाढूनही नोकरभरती करण्यात अडचणी येत आहेत. सध्या पाचशेपेक्षा अधिक पदे रिक्त असल्यामुळे आहे त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त काम करून घेतले जात आहे. दरम्यान, सुमारे बाराशे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले. त्यांच्या वेतनासाठी महापालिकेला महिन्याला सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च करावे लागतात. मात्र हे कर्मचारी कायम नसल्याने त्यांच्यावर कोणतीही महत्त्वाची जबाबदारी टाकता येत नाही. मात्र करवसुलीसह अनेक महत्त्वाची कामे या कामगारांना देण्यात आली आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नवा आकृतिबंध तयार केला होता. मात्र जुना आकृतिबंध मंजूर असल्याने निपुण विनायक यांनी तयार केलेला आकृतिबंधाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने फेटाळला. अधिकारी संघटनेनेदेखील त्याला विरोध केला होता. दरम्यान, जुन्याच आकृतिबंधाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. आयुक्तांनी शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी आकृतिबंध पाठवला. मात्र राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने आकृतिबंधातील त्रुटी काढून तो परत पाठवला आहे. 

शासनाने केल्या या सूचना 

विभागनिहाय कर्मचाऱ्यांची पदसंख्या सादर करावी, पदांची आकडेवारी योग्य पद्धतीने मांडण्यात यावी, सेवाभरतीच्या नियमानुसार दिलेल्या तक्त्यामध्येच आकृतिबंध सादर करावा. 

 मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महापालिकेच्या सेवेत दोन रुग्णवाहिका

महापालिकेकडे रुग्णवाहिका नसल्याने मोठी अडचण होत होती. त्यामुळे दोन रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गुरुवारी (ता. नऊ) रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. महापालिका अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या सभासदांचे एक दिवसाचे वेतन, प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय आणि जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या एक महिन्याच्या वेतनातून तीन रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातील दोन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

(संपादन : मधुकर कांबळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT