Young man Murdered in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

रात्री कॉल आला अन् कायमचाच घेऊन गेला, झाले असे की....

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - थर्टी फर्स्टच्या रात्री दहाच्या सुमारास एक कॉल आला. या कॉलनंतर तो दुचाकी घेऊन घरातून बाहेर गेला. त्याच्यासोबत दोन साथीदार होते. त्यानंतर तो घरी परतला नाही, त्याचा नाल्याजवळ जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. कॉल आला म्हणून तो घराबाहेर गेला. तो कॉल काळ म्हणून आला व त्याला घेऊन गेला असेच म्हणावे लागेल.

चार वर्षांपूर्वी गाजलेल्या चित्रा डकरे खून प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या पोलिसाच्या मुलाच्या पोटावर दोन्ही बाजूने वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर त्याला एका नाल्याजवळ नेत ओळख पटू नये म्हणून जाळल्याची थरारक घटना औरंगाबादेतील सिडको एन-सात परिसरात शुक्रवारी (ता. तीन) उघडकीस आली. जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह महापालिका उद्यानच्या भिंतीलगतच्या नाल्याजवळ आढळून आल्यानंतर खुनाची बाब समोर आली.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अमोल नारायण घुगे (वय 22, रा. शिवनेरी कॉलनी) असे मृताचे नाव आहे. तो पोलिसाचा मुलगा असून बहुचर्चित चित्रा डकरे खून प्रकरणातील तो
संशयित होता.

थर्टी फस्ट अर्थात 31 डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास तो घरातून बाहेर गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रारही सिडको पोलिस ठाण्यात दिली होती. यानंतर त्याचे नातेवाईक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही गेले होते; पण त्यांची भेट झाली नव्हती असे सांगण्यात आले. शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या उद्यानाजवळील नाल्यालगत मृतदेह आढळल्यानंतर तो अमोलचा असल्याचे समोर आले. यानंतर मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला. खून झाल्याची बाब समोर आल्यानंतर याप्रकरणी चौघांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात खुनाच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पंधरा दिवसांपूर्वी झाले होते भांडण 
अमोल घुगे याचे पंधरा दिवसांपूर्वी भांडण झाले होते. तर 31 डिसेंबरला रात्री अमोलला मारहाण होताना काही नागरिकांनीही पाहिले होते अशी बाब कुटुंबीयांना समजली. अमोलचा मोबाईल व दुचाकीही गायब असल्याने या प्रकरणात आणखीनच गूढ वाढले आहे. 

म्हणून त्याला जाळले.. 
मृताच्या पोटावर डाव्या व उजव्या बाजूने वार करण्यात आले असून, त्याच्या पायावरही जखमा दिसून आल्या. त्याचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह असून पुरावा नष्ट करण्याच्या व ओळख पटू नये म्हणून पेट्रोल ओतून हे कृत्य केले असावे असा कयास पोलिसांनी लावला आहे. मृताची ओळख त्याच्या लहान भावाने पटविल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात
आली. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !
  
पोलिसांवर नातेवाइकांचा रोष 
अमोल 31 डिसेंबरला घरी न आल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार सिडको ठाण्यात देण्यात आली. अमोल घरातून रस्त्यावर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखविले व त्याच्यासोबतच्या दोघांवर गुन्हा नोंदविण्याची मागणीही कुटुंबीयांनी सिडको पोलिसांकडे केली होती; पण सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. 
 
घाटीत क्‍यूआरटी पाचारण 
मृताची ओळख पटताच अमोलच्या नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर मोठी गर्दी घाटीत झाली. परिस्थिती लक्षात घेत घाटीत क्‍यूआरटी पथकासह पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. यानंतर नातेवाइकांनी रोष व्यक्त करून आयुक्त बोलवण्याची मागणी केली. मृताची शनिवारी उत्तरीय तपासणी होणार आहे. मृताला दोन बहिणी व एक भाऊ आहेत. 
 
तो डकरेंच्या खुनातील संशयित 
डॉ. चित्रा डकरे (वय 60) यांचा सिडको एन-दोन, एम टू येथील वसाहतीत गळा चिरून खून झाला होता. त्या मूळ हिवरखेड, ता. मोहाडी, जि. अमरावती येथील होत्या. त्यांची मुलगी व औरंगाबादेतील डॉ. स्नेहल आस्वार यांच्याकडे त्या काही दिवसांसाठी पाहुण्या म्हणून आल्या होत्या. दोन डिसेंबर 2015 ला चोरीच्या उद्देशाने मारेकरी डॉ. आस्वार यांच्या घरात घुसले
होते. त्यावेळी घरात डॉ. चित्रा एकट्याच होत्या. त्यांच्या प्रतिकारानंतर मारेकऱ्यांनी त्यांचा खून केला होता. खुनातील एक संशयित त्यावेळी अल्पवयीन तर दुसरा संशयित अमोल होता. यात गुन्ह्याची नोंदही झाली होती. 

चौघांपैकी दोघे ताब्यात 
अमोल घुगे याच्या खूनप्रकरणी चौघा संशयितांवर सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार सौरभ वानखेडे, गौरव वानखेडे, रितेश फुसे, शुभम विसपुते अशी संशयितांची नावे आहेत. यातील गौरव व शुभम यांना सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता अमोलचा खून करून जाळले अशी त्यांनी कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले; मात्र खुनाचे कारण अद्याप समोर आले नाही. नशापान करून संशयितांनी खून केला असा प्राथमिक संशय आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT