संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनासोबत जगायचे म्हणचे नेमके कसे वागायचे...वाचा सविस्तर

मनोज साखरे

औरंगाबाद- कोरोनाचा कहर सध्यातरी कमी होताना दिसत नाही; पण सरकारच काय तर सर्वच म्हणतात, आता कोरोनासोबत जगावे लागेल. मग कोरोनासोबत जगायचे म्हणचे नेमके कसे जगायचे, हा प्रश्‍न सहजच मनाला स्पर्शून जातोच. आपल्या मूलभूत बाबींत आता मास्क आणि स्वच्छतेसह आरोग्याला अत्युच्च महत्त्व आहे. कोरोनासोबत जगायचे म्हणचे खूप काळजी घ्यायची, बदलांचा स्वीकार करायचा आणि दैनंदिन व्यवहारही सुरक्षित ठेवायचा. संसर्गाचा काळ संपेपर्यंत, रामबाण लस येईपर्यंत असेच जगावे लागेल. 

कोरोनासोबत जगताना... 
घरातून बाहेर पडताना सॅनिटायझरची बाटली, छोटा स्प्रे सोबत ठेवा. मास्क वापरा. गर्दी असेल तेव्हा अथवा नसेल तेव्हा मास्क कसा वापरायचा, त्याचे नियम पाळा. कामासाठी जरी बाहेर पडत असाल तरीही व्यक्ती-व्यक्तीत सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे. कार्यालय असो की कोणतेही कामाचे ठिकाण, ती जागा सॅनिटाईज करण्याची सवय लावा. अगदी कार्यालयात पाणी प्यायचे असल्यास कुणी आसपास नसेल तेव्हाच पाणी पिणे योग्य. कार्यालयाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जेवण न केल्यास चांगले. शक्यतो घरीच भोजन करा, हॉटेलमध्ये तूर्तात तरी न गेलेले चांगले. घराशिवाय भोजन करीत असाल तर अशी जागा निवडा जिथे आपण एकटे असाल. कुटुंबाशिवाय सहभोजनाला फाटा द्या. एकत्र खाणे, एकाच ताटात खाणे टाळा. 

नातेसंबंध जपा; पण सुरक्षा बाळगून 
घरात कुणी पाहुणे आले तरी त्यांना कोरोना संसर्गाच्या धोक्याची जाणीव करून द्या. नातेसंबंध महत्त्वाचेच परंतु आपली व नातेवाइकांचीही सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचीही स्वतंत्र व्यवस्था करा. त्यांनाही सॅनिटाईज करायला सांगा. जर तुम्ही पाहुण्यांकडे गेलात तर तुम्हीही त्यांना अडचण होणार नाही, ते संकटात येणार नाहीत असे वर्तन ठेवा. अगदी लग्नसमारंभही छोटेखानी, साधे असावेत. अंत्यसंस्कारासाठीही घालून दिलेले नियम पाळा. 

व्यवहाराच्या गोष्टी 

  • किराणा व इतर वस्तू सॅनिटाईज करा. स्वच्छ धुवूनही घ्या. 
  • सुरक्षित अंतर ठेवा; पैशांचा व्यवहार ऑनलाइनच करा. 
  • बाजारपेठेत खरेदीला जाताना गर्दी करू नका.  
  • ग्राहकाने दुकानात जाऊन उगाचच वस्तू हाताळू नयेत.  

हे वाचा आणि अमलात आणा 

  • कोरोना रुग्णांबाबत मनात शंका, भीती आणू नका. 
  • कुणी काळजीपोटी  सांगितल्यास अपमान झाला असे नाही. 
  • जगताना  अनेक न रुचणारे अनुभव येतील, ते स्वीकारा. 
  • कोरोनानंतरचे जग थोडे वेगळे असेल, ते समजून घ्या. 
  • वर्क फ्रॉम होम ही संकल्पना स्वीकारा. 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT