Asat.jpg 
छत्रपती संभाजीनगर

अडला शेतकरी..व्यापाऱ्यांचे पाय धरी! 

बाळासाहेब लोणे

गंगापूर (औरंगाबाद) : दिवाळीची चाहुल लागली असली तरी, यंदा तालुक्यातील शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. कपाशी घरातच पडून असल्याने त्यांना पैशांचीही चणचण आहे. ही कपाशी शासन खरेदी कधी करेल, या विवंचनेत सध्या शेतकरी आहेत. सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र अजूनही सुरु झाले नसल्याने नाराजी आहे. 

परतीच्या पावसाने बहरलेल्या कपाशीला नख लावल्याने उत्पन्नात ७० टक्के घट येण्याची स्थिती आहे. कोरोनामुळे लागवड व मजुरीचाही खर्च फुगला आहे. ४२०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटलने खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत असून अडला शेतकरी...व्यापाऱ्यांचे पाय धरी..' अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. 

कपाशीचा एकरी लागवडीचा खर्चही यंदा वाढला आहे. मजुरीचे दरही भरमसाठ वाढले आहेत. थेट मध्यप्रदेशातून मजूर आणावे लागत आहे. उत्पन्न खर्चात वाढ आणि मजुरांची टंचाई अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय कपाशी खरेदी केद्र सुरु होण्याची मोठी प्रतिक्षा आहे. दिवाळीच्या अगोदर एक वेचणी होते, त्यानंतरही दुसरी वेचणी केली जाते. यावर्षी दुसऱ्या वेचणीची शक्‍यता धुसर असल्याने आहे. 

सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या हाती पैसा नसल्याने व्यापारऱ्यांकडून कमी दर देऊन कपाशी खरेदी केली जात आहे. दोन दिवसांत कापूस खरेदी केंद्र सुरू न केल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल. 
- संतोष जाधव, माजी सभापती, बांधकाम विभाग 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT