Aurangabad
Aurangabad Aurangabad
छत्रपती संभाजीनगर

नोकरीचा नाद सोडून अभियंत्याने फुलविली डाळिंब बाग

नवनाथ इधाटे

फुलंब्री (औरंगाबाद): नोकरीसाठी शोधाशोध केली असता निराशा हाती आल्याने फुलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्द येथील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची पदवी घेतलेल्या अभियंत्याने बेरोजगारीवर मात केली आहे. दोन एकर जमिनीत डाळिंब बागची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न काढले आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर हे यश मिळविले असून तरुणांनीही आता शेतीकडे वळण्याचे आवाहन या अभियंत्याने केले आहे.

फुलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्दच्या आजिनाथ पांडुरंग तुपे या तरुणाने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची पदवी प्राप्त केली आहे. पदवी मिळविल्यानंतर जवळपास एक-दोन वर्ष नोकरीची शोधाशोध केली. मात्र, सध्याच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळत नसल्याने तो हताश झाला. यानंतर त्याने नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे आपले लक्ष केंद्रित तेले. यानंतर सुरवातीला केवळ ३० गुंठ्यात डाळिंब बागांची लागवड केली. सदरच्या बागेत ३०० डाळिंबाच्या झाडांची लागवड केली होती. यातून चांगले उत्पन्न मिळाल्याने या तरुण शेतकऱ्याने यापुढे दोन एकर डाळिंबाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

तसेच डाळिंबाच्या बागेला पाणी देण्यासाठी एक शेततळे, सिंचन विहीर आणि बोअरच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे दररोज दीड तास पाणी देण्याचे नियोजन केले. विहीर व बोअरच्या माध्यमातून पाणी सिंगल फ्युजच्या विद्युत पंपाद्वारे शेततळ्यात सोडण्यात येते. आणि नंतर शेततळ्यातून फिल्टर मशिन द्वारे ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी देण्यात येते. तसेच रासायनिक औषधी, खते, आणि फवारणी करण्यासाठी दिन ड्रममध्ये पाणी, खते, औषधी मिसळून एच.टी.पी.मशीनद्वारे दर तिसऱ्या दिवशी पाण्यात मिसळून बागेत ठिबक सिंचनामार्फत सोडण्यात येते.

गतवर्षी बाजार भाव कमी मिळाल्याने उत्पन्न जेमतेम मिळाले आहे. तसेच प्लेग नावाचा रोग या डाळिंबावर आल्याने मोठ्या अडचणीचा सामना तुपे या शेतकऱ्याला करावा लागला. त्यामध्ये साडे तीन ते चार लाख रुपयापर्यंत उत्पन्न काढले. आणि आता सध्या डाळिंबाची बाग चांगली बहरलेली असल्यामुळे बाजार भाव चांगला मिळाल्यास दहा लाख रुपयांचे उत्पन्न काढण्याचा संकल्प या शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. डाळिंबाला पाणी देण्यासाठी विहीर, बोअर आणि शेततळ्यावरच बाग फुलविल्याने बेरोजगारीवर मात करत तरुणांसमोर त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. या परिसरात कुठलेही धरण, नदी, मोठाले नाले, मोठे तलाव नसतानाही एका शेततळ्यातील पाण्याचे एका वर्षाचे नियोजन आखून डाळिंबाची बाग फुलाविण्याचे काम पती, पत्नी करीत आहेत.

सेंद्रिय खताचा वापर
-तालुक्यातील आडगाव खुर्द येथील अभियंता शेतकरी आजिनाथ पांडुरंग तुपे व त्याची पत्नी सविता आजिनाथ तुपे या दोघांनी डाळिंबाच्या बागेचे नियोजन करून केमिकल व रासायनिक खताचा वापर कमी केला आहे. या डाळिंबाच्या भागात दोन एकर सेंद्रिय खताचा वापर वाढविला असल्याने उत्पन्नातही भरघोस वाढ होत आहे. डाळिंबाच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फुलोरा लागत असल्याने बागही बहरला आहे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे खर्चाचीही बचत होत असल्याचे आजिनाथ तुपे व त्याची पत्नी सविता तुपे यांनी सांगितले.

इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक-दोन वर्ष शहरात नोकरीची शोधाशोध केली, परंतु नोकरी न मिळाल्याने निराश न होता शेतीकडे वळलो आणि मुरमाड जमितूनही डाळिंबाची बाग फुलविली आहे. पत्नी सविता तुपे हिची डाळिंबाची बाग फुलविण्यात मोठे सहकार्य मिळत आहे. यावर्षी दोन एकर डाळिंबाची बाग असून चांगला बाजार भाव मिळाल्यास १० लाख रुपयांचे उत्पन्न निघेल अशी अपेक्षा आहे.
- आजिनाथ पांडुरंग तुपे, शेतकरी तथा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची पदवी अभियंता, आडगाव खुर्द

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT