latur sakal
छत्रपती संभाजीनगर

Latur News : मनोज जरांगे पाटील यांची निलंगा शहरात आज सभा

निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता भव्य सभा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

निलंगा : शनिवारी (ता. ९) निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता भव्य सभा होणार आहे. सभेला दीड लाख नागरिक उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत आयोजकांच्या वतीने देण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांचे निलंगा नगरीत आगमन होताच उदगीरमोड येथे दलित बांधवांच्या वतीने, जिजाऊ चौकात लिंगायत बांधवांच्या वतीने तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुस्लिम समाज, डॉक्टर व वकील मंडळी यांच्या वतीने त्यांचा सत्कार होणार आहे.

छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणहून २१ बैलगाडीच्या रॅलीतून ज्यांचे सारथ्य महिलांच्या हाती असेल. एका बैलगाडीत जरांगे पाटील असतील. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सभेच्या ठिकाणी बैलगाडीतून पुष्पवृष्टी करत जरांगे पाटील यांचे आगमन होईल. विचारपीठावर पाच मुलींच्या हस्ते त्यांचे स्वागत होईल.

त्यानंतर सर्व जातिधर्मांतील प्रतिनिधीच्या वतीने पाठिंबा पत्र देण्यात येईल. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला महिला व विद्यार्थी यांची बसण्याची व्यवस्था उजव्या बाजूला पुरुषांसाठी बसण्याची व्यवस्था, सभेच्या ठिकाणी आठ स्क्रीन लावण्यात येणार आहेत. सभेच्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांना पाणी आणि अल्पोपाहार देण्यात येणार आहे.

सभेच्या सर्व बाजूंनी मोबाईल व्हॅन दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे.महिलांसाठी खास पाच वाजेपर्यंत येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र इंजिनिअर कॉलेज च्या पाठीमागील मैदानात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास दोन हजार स्वयंसेवक व तीनशे स्काउट गाईडचे विद्यार्थी व्यवस्थेसाठी राहणार आहेत.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना सभेच्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून येता येणार आहे. त्यांना कोणीही विरोध करणार नाही असे आयोजकांनी सांगितले. तर सायंकाळी पाच वाजेपासून शाहीर राजेंद्र कांबळे (खूडूसकर) यांच्या शाहिरीचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

जरांगे पाटील यांच्या सभेला सर्व जातिधर्मांतील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, यावेळी संयोजकांनी केले. यावेळी ईश्वर पाटील, चक्रधर शेळके, विशाल जोळदापके, विनोद सोनवणे, विलास लोभे, बबन राजे, आंबादास जाधव, राजकुमार सांळुके, प्रकाश गोमसाळे, सुरेंद्र जाधव, किरण पाटील, प्रमोद कदम, भगवान जाधव, जगदीश लोभे, भरत चव्हाण, अजित लोभे, रमेश लांबोटे आदी उपस्थित होते.

बसण्याची व्यवस्था

महिला व विद्यार्थी यांची बसण्याची व्यवस्था उजव्या बाजूला पुरुषांसाठी बसण्याची व्यवस्था, सभेच्या ठिकाणी आठ स्क्रीन लावण्यात येणार आहेत. सभेच्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांना पाणी आणि अल्पोपाहार देण्यात येणार आहे. सभेच्या सर्व बाजूंनी मोबाईल व्हॅन दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heart Attack : पीएमपी चालकाला ह्रदयविकाराचा झटका; लक्ष्मी रस्त्यावरील घटना

Manchar News : लग्नाऐवजी दशक्रिया; क्षीरसागर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, मंचर येथील दुर्दैवी घटना

Thane Traffic: गणेशोत्सवानिमित्त ठाण्यात वाहतूक बदल; अनेक मार्ग बंद, पाहा पर्यायी मार्ग कोणते?

Ganesh Chaturthi 2025 Marathi Wishes: आला आला माझा गणराज आला...! गणेश चतुर्थीच्या प्रियजनांना पाठवा मराठीतून भक्तीमय शुभेच्छा

Latest Maharashtra News Updates: महापालिकेतील सुरक्षारक्षकांना मिळणार नवीन शस्त्र

SCROLL FOR NEXT