dividers  Sakal
छत्रपती संभाजीनगर

शिस्त दूरच; बेशिस्त वाढली! बंद दुभाजकांमुळे अनेक वाहनधारक राँग साइड

शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी बहुतांश दुभाजकांची सलग लांबी वाढवली आहे. मात्र, याचे चांगल्याऐवजी वाईट परिणाम दिसत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अनिल जमधडे

शहरातील दुभाजकांची सलग लांबी वाढविण्यात आली. ठिकठिकाणी चौकांमध्ये दुभाजक बंद करण्यात आल्याने दुचाकीस्वार सर्रास वेळ आणि अंतर वाचविण्यासाठी राँग साइडचा अवलंब करीत आहेत. यामुळे रोज अपघातांची मालिका सुरू झाली आहे. त्यामुळे ‘होने दे थोडीसी देरी, अभी बहुत जिंदगी बाकी हैं मेरी’ म्हणत वाहनधारकांनी असा शॉर्टकट टाळायला हवा.

शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी बहुतांश दुभाजकांची सलग लांबी वाढवली आहे. मात्र, याचे चांगल्याऐवजी वाईट परिणाम दिसत आहेत. अनेक चौकांमध्ये दुभाजक बंद केल्याने वाहनधारकांना चौकातून वळण घेऊन येण्यासाठी पाचशे मीटर ते अर्ध्या किलोमीटरपर्यंतचा फेरा मारावा लागतो. फेरा मारून येण्यासाठी नागरिकांची नकारघंटा आहे. फेरा टाळण्यासाठी काही वाहनधारक थेट राँग साइडचा वापर करीत आहेत. परिणामी, अपघात घडत आहेत.

या ठिकाणी डिव्हायडर ब्लॉक

आकाशवाणी चौक, अमरप्रीत चौक, रामगिरी हॉटेलचा चौक बंद करण्यात आला. जळगाव रस्त्यावर सिडको बसस्थानकाच्या पुढे असलेला दुभाजक बंद करण्यात आला. जळगाव रस्त्यावर गरवारे चौकात सर्व्हिस रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येणारा रस्ताच बंद केला. अदालत रोडवरील चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंपसमोरचे दुभाजक बंद करण्यात आले. एम्प्लॉयमेंट ऑफिससमोरचे दुभाजक बंद करण्यात आले. मध्यवर्ती बसस्थानकासमोरचे दुभाजक बंद करण्यात आले. बीड बायपासवर कमलनयन रुग्णालयाच्या जवळचा दुभाजक बंद करण्यात आला. याशिवाय अनेक रस्त्यांवरील चौक बंद करून, दुभाजकांची लांबी वाढविण्यात आली आहे.

काय झाली समस्या?

वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक दुभाजक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्या ठिकाणच्या वाहतुकीचा आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करण्यात आला नाही. अनेक ठिकाणी पाचशे मीटर राँग साइड जा किंवा अर्ध्या किलोमीटरचा फेरा मारून या, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वाहनधारक कुठलाही विचार न करता पाचशे मीटर राँग साइड जाणे पसंत करतात. अशा ठिकाणच्या बंद केलेल्या दुभाजकांचा पोलिसांनी फेरविचार करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

Latest Marathi News Live Update : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाच्या विरोधात आज सुनावणी

Amravati Crime News : साहील लॉनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे खून; अमरावतीत १७ वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणी मोठा खुलासा...

Pune Temperature : पुण्यातील तापमानात चढ-उतार कायम; पुणे शहर परिसरात थंडीचा प्रभाव

Black Magic : भूतबाधेच्या अंधश्रद्धेतून विवाहितेवर अमानुष हल्ला; पाच वर्षांच्या मुलासमोरच कडुलिंबाच्या काठ्यांनी क्रूरपणे मारहाण

SCROLL FOR NEXT