Maratha Reservation Kunbi Certificate esakal
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation : घरात अडगळीत पडलेली ट्रंक उघडली अन् अख्ख्या गावाच्या सापडल्या कुणबी नोंदी!

आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येताच शासनाने कुणबी नोंद असणाऱ्यांना प्रमाणपत्र देणे सुरु केले.

सकाळ डिजिटल टीम

गावातील अनेक कुटुंबांच्या भावी पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न या ट्रंकेतील नोंदींनी सोडवला!

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावातील (Sillod Dhanora) एका युवकाने घरात अडगळीत पडलेली ट्रंक ओढली आणि त्यात काय आहे पाहिले तर काहीतरी जुन्या-पुरान्या नोंदी (Kunbi Certificate) होत्या. त्या उघडून पाहिल्या तेव्हा अख्ख्या गावातील नोंदी सापडल्या! त्यातील काही उर्दूत तर काही मराठीत होत्या.

अंदाजे चार ते पाच हजार नोंदी या दस्तावेजात आढळल्या आणि बहुतांश नोंदी या ‘कुणबी’ आहेत. गावातील अनेक कुटुंबांच्या भावी पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न या ट्रंकेतील नोंदींनी सोडवला! दरम्यान, या नोंदी प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आल्या.

आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येताच शासनाने कुणबी नोंद असणाऱ्यांना प्रमाणपत्र देणे सुरु केले. मात्र, आता कुणबी नोंदीचा पुरावा आणायचा कुठून, असा प्रश्न निर्माण झाला. प्रशासकीय स्तरावर तर या नोंदींचा शोध सुरुच झाला. शिवाय अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केल्यानंतर त्यांच्या पाठिंब्यासाठी सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील धानोरा येथील राधाकृष्ण काकडे यांच्यासह काहीजण उपोषणाला बसले होते.

उपोषण संपल्यानंतर उपोषणार्थींनीही कुणबी जातीच्या नोंदीचे पुरावे कुठे मिळतील, यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याचवेळी सोमीनाथ काकडे यांना त्यांच्याच घरात एका अडगळीत पडलेल्या ट्रंकेत जीर्ण झालेल्या कागदांचे गठ्ठे मिळाले. त्यावरची धूळ झटकली असता त्यात निजामकालीन उर्दू भाषेतील व काही देवनागरीत भाषांतरीत केलेल्या महसुली नोंदीचा खजिनाच हाती लागला.

राधाकृष्ण काकडे, सोमीनाथ काकडे यांनी सांगितले, की पाच ते सहा मोठ्या फाइली सापडल्या आहेत. त्यात बहुतांश ‘कुणबी’ अशाच सर्वाधिक नोंदी आहेत. दरम्यान, प्रशासनाला भेटलेल्या शिष्टमंडळात राधाकृष्ण काकडे, सोमीनाथ बाळा काकडे, अजय काकडे, हरिश्चंद्र काकडे, मच्छिंद्र काकडे, सोमीनाथ काकडेशेठ, नारायण काकडे, स्वामी सरस्वानंद गिरीजी महाराज आदींचा समावेश होता.

तेव्हाच्या ‘पांडेबुवां’नी जपले होते दस्तावेज

याबाबत सोमीनाथ काकडे म्हणाले, की त्यांचे आजोबा अंबादास पुंजाजी काकडे हे तेव्हाचे ‘पांडेबुवा’ म्हणजे आजचे तलाठी म्हणून काम बघायचे. तहसीलच्या सगळ्या नोंदी तेच ठेवायचे, हे दस्तावेज घेऊन ते निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांना दाखवण्यासाठी गुरुवारी (ता. नऊ) शिष्टमंडळासह आले होते. दिवंगत अंबादास काकडे यांच्या हातच्या नोंदींचा ‘खजिना’ हाती लागल्याने गावातील अनेक कुटूंबांच्या भावी पिढ्यांचे कल्याण झाले. जिल्हा प्रशासन या कागदपत्रांचे स्कॅनिंग करुन ते संकेतस्थळावर अपलोड करणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विधाते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT