Marathwada And Aurangabad Corona Updates 
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात आणखी साडेसहाशे रुग्ण, सर्वाधिक २७५ कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात

मनोज साखरे

औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२५) दिवसभरात ६५४ कोरोनाबाधित आढळले. त्यात औरंगाबादेत २७५, जालना ८५, लातूर ८०, नांदेड ७०, हिंगोली २४, परभणी ४१, बीड ५३, उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४९ हजार ५६६ वर पोचली आहे. सध्या १ हजार ५११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी ७२ जणांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४६ हजार ७९३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २६२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरातील बाधित (२४६)
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) : कांचनवाडी (१), गारखेडा (३), उल्कानगरी (२), वेदांतनगर (५), हर्सूल (१), उत्तमनगर (१), शिल्पनगर (१), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप परिसर (२), रेल्वे स्टेशन (१), ज्योतीनगर (१), जवाहर कॉलनी (४), पदमपूरा (१), रोशन गेट (१), इटखेडा (१), बीडबायपास परिसर (८), चेतना टॉवर (१), संत एकनाथ रंगमंदिर परिसर (१), पेठेनगर, भावसिंगपूरा (१), हरसिध्दीनगर (१), श्रीकृष्णनगर हडको (२), एन-१२ (१), एन-९ सिडको (२), एन-४ सिडको (१), सूतगिरणी चौक (१), एन-दोन सिडको (६), एन-तीन सिडको (२), एन-४ सिडको (१), जयभवानीनगर (३), ज्योतीनगर (१), शिवाजीनगर (२), एमआयडीसी कॉलनी, नारेगाव (१), एन-सात सिडको (१), एम-दोन सिडको (१), एन-६ सिडको (१), चिकलठाणा (१), सुराणानगर (२), समर्थनगर (१), दशमेशनगर (१), हनुमाननगर (१), बालाजीनगर (१), शिवशंकर कॉलनी (१), देवानगरी (१), एन आठ सिडको (१), अरुणोदय कॉलनी (१), विद्यानगर (१), सुधाकरनगर (१), पॉवर हाऊस (१), सुंदरनगर, पडेगाव (१), यशोधरा कॉलनी (१), इएसआयएस स्टाफ क्वार्टर परिसर (४), दिशानगरी, बीड बायपास (१), ठाकरेनगर (१), मामा चौक, पद्मपूरा (१), गजानन कॉलनी, गारखेडा (१), उस्मानपूरा (१), टिळकनगर, जवाहर कॉलनी (१), पद्मपूरा (२), मीरानगर, पडेगाव (३), शहानूरवाडी (१), एअरपोर्ट समोरील परिसर (१), सिडको (१), सुशीला अपार्टमेंट, विद्यानगर (१), पीडब्ल्यूडी कॉलनी, बीड बायपास (१), एन वन सिडको (२), केशवनगरी, शहानूरवाडी (२), एन अकरा सिडको (१), एन नऊ सिडको (२), हनुमान मंदिर, द्वारका चौक (१), एमजीएम कॅम्पस (१), हडको (१), एन बारा हडको (१), मराठा हायस्कूल परिसर (१), कासलीवाल मार्बल, बीड बायपास (१), अन्य (१३३).



ग्रामीण भागातील बाधित (२९) : लासूर स्टेशन, वैजापूर (१), डोणगाव, गंगापूर (३), चौका, फुलंब्री (२), पिशोर, कन्नड (१), सारा समृद्धी वडगाव (१), दक्षिणमुखी हनुमान मंदिर बजाजनगर (१), वडगाव (१), द्वारकानगरी, बजाजनगर (१), अयोध्यानगर, बजाजनगर (१), म्हाडा कॉलनी, बजाजनगर (१), एस टी कॉलनी बजाजनगर (१), अन्य (१५).


दहा जणांचा मृत्यू
उपचारादरम्यान दहा जणांचा मृत्यू झाला. त्यात औरंगाबादेतील चार, जालन्यात दोन, लातूर, हिंगोली, परभणी, बीडमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सातारा परिसरातील ७३ वर्षीय पुरुष, गडलिंब, गंगापुरातील ५० वर्षीय महिला, देवानगरी येथील ८० वर्षीय पुरुषाचा घाटी तर गारखेडा परिसरातील ७३ वर्षीय महिलेचा आणि खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
---------------
कोरोना मीटर (औरंगाबाद)
------------
आतापर्यंतचे बाधित- ४९५६६
बरे झालेले- ४६७९३
उपचार घेणारे- १५११
आतापर्यंत मृत्यू- १२६२

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: पानिपतकार विश्वास पाटील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

Kamshet News : कामशेतमध्ये महामार्गालगत कचऱ्याचे ढीग,दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; व्यवस्थापनाअभावी गंभीर परिस्थिती

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सरकारमध्येच जुगलबंदी: भुजबळ-विखे पाटलांमध्ये मतभेद

Sangli Crime News : राजकीय स्वीय सहायकाचा त्रास, पंचायत समितीतील २७ वर्षीय अभियंत्याचा मृत्यू; कृष्णा नदीत मृतदेह सापडल्याने आरोप...

PCMC News : नवनगर विकास प्राधिकरणाच्या जमिनी द्या, पीएमआरडीएची मागणी; अतिक्रमणबाधितसह मोकळ्या जागा हव्यात

SCROLL FOR NEXT