msedcl.jpg
msedcl.jpg 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : अरे बाप..! आता महावितरणची यंत्रणा आली अडचणीत, वाचा ते कसे..!  

अनिल जमधडे

औरंगाबाद : मराठवाड्यात महावितरणच्या औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलअंतर्गत आठ जिल्ह्यात तब्बल २,८६३ कोटी रुपयांची थकबाकी झाल्याने महावितरणची यंत्रणा अडचणीत सापडली आहे. लॉकडाउन कालावधीत वीज ग्राहकांनी बिलाचा भरणा न केल्याने थकबाकीचा डोंगर वाढतच गेला आहे.

मराठवाड्यात कंटेनमेंट झोन परिसर वगळता इतर भागातील वीजबिल भरणा केंद्रे व प्रत्यक्ष मीटररीडिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. लॉकडाउन काळात मार्च, एप्रिल व मे २०२० या तीन महिन्यांसह थकीत असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहक, शहरातील पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा व कृषिपंप वगळता इतर २१,९५,६७९ वीजग्राहकांकडे २,८६३.४५ कोटी रुपयांपेक्षा जास्त वीजबिलाची थकबाकी झाली आहे. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
अशी आहे थकबाकी 
महावितरण औरंगाबाद परिमंडलात म्हणजे जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ७,२०,६३६ वीज ग्राहकांकडे ६५८.३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. लातूर परिमंडलात ७,४८,२८४ वीज ग्राहकांकडे १,२२६.६० कोटी रुपयांची थकबाकी आहे. नांदेड परिमंडलात ७,२६,७५९ वीज ग्राहकांकडे ९७८.५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. 

केवळ ८६ कोटींची वसुली 
महावितरण महानिर्मिती कंपनीसह खासगी वीजनिर्मिती कंपनीकडून वीज विकत घेते. ही वीज महापारेषण कंपनीकडून महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रापर्यंत पोचविली जाते. नंतर महावितरण कंपनीकडून ही वीज वीजग्राहकांपर्यंत पोचविली जाते. लॉकडाउन कालावधीत वीजग्राहकांनी वीजबिल भरणा केंद्र सुरू नसल्यामुळे बिलाचा भरणा केलेला नाही. एप्रिल व मे मध्ये मराठवाड्यात केवळ ८६.४० कोटी रुपयांचा ऑनलाइन वीजबिलाचा भरणा झाला आहे. 

बिल भरणा केंद्र सुरू 
कंटेनमेंट झोन परिसर वगळता मराठवाड्यातील वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तसेच प्रत्यक्ष मीटररीडिंगही सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय ऑनलाइन वीजबिलही भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांची वीजबिलाबाबत काही तक्रार, शंका असल्यास जवळच्या महावितरण उपविभागीय कार्यालयात आपली तक्रार नोंदवून पोच घ्यावी. या तक्रारीचा शहानिशा करून निपटारा करण्यात येईल. वीजग्राहकांनी चालू बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांनी केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT