Aurangabad News
Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

राष्ट्रवादीच्या स्थापनेत मराठवाड्याचा सहभाग लक्षवेधी 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : देशाच्या राजकीय वर्तुळात अल्पावधीत अतिशय महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या मोजक्या राजकीय पक्षांपैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होय. राजकारणातील मातब्बर म्हणून ओळखल्या जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १० जून १९९९ रोजी १३ व्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची स्थापना करण्यात आली. तेव्हा मराठवाड्यातील नेत्यांचा सहभाग लक्षवेधी राहिलेला आहे.

पक्ष स्थापन करताना मराठवाड्यातील हिंगोली, नांदेडमधून सूर्यकांता पाटील, विलास गुंडेवार, बापूसाहेब गोरटेकर, जयप्रकाश दांडेगावकर, दिलीप चव्हाण, डॉ. हंसराज वैद्य, कमलकिशोर कदम, शिवराज पाटील होताळकर, अनंत पाटील, शिवाजी वाडीकर, सुरेश बांगर, गोरेगावकर, परभणीमधून सुरेश वरपुडकर, बाबाजानी दुर्राणी, प्रताप देशमुख, संजय देशमुख, विजय कदम, विजय गव्हाणे, फौजिया खान, विटेकर, बोबडे, जालनामधून उल्हास उढाण, रवींद्र तौर, अण्णासाहेब उढाण, अंकुशराव टोपे, डॉ. पंढरीनाथ धाणोरे, बाळासाहेब वाकुळणीकर, सवाईराम जाधव, वैजनाथराव आकात, नानासाहेब देशमुख, अरविंद चव्हाण, भोकरदन येथून लक्ष्मण दळवी, शकुंतला कदम, भुजंगराव गोरे,

औरंगाबादमधून किशोर पाटील, द्वारकादास पाथ्रीकर, प्रभाकर पालोदकर, किरण साळवे, पार्वतीबाई शिरसाठ, सुधाकर सोनवणे, संजय वाघचोरे, चंद्रकांत घोडके, कांताबापू आवटे, झारगड मामा, साहेबराव डोणगावकर, कृष्णा पा. डोणगावकर, कैलास पाटील चिकटगावकर, मनमोहन सिंग आबेरॉय, सोहेल कादरी, दिलीप पेरे, सुरजितसिंग खुंगर, माधवराव बोर्डे, कमाल फारुकी, अनिल जाधव, डॉ. बाळासाहेब पवार, कैलास पाटील, छाया जंगले, वीणा खरे, विलास चव्हाण, सोपानराव खोसे, शैलेश सुरासे, मधुकरराव मुळे, लातूरमधून बाळासाहेब जाधव, संजय बनसोडे, संजय शेटे, बाळापाटील पाटील, मुर्तुजा खान,

उस्मानाबादमधील पद्मसिंग पाटील, जीवनराव गोरे, महारुद्र मोटे, वसंतराव काळे, बीडमधील जयदत्त क्षीरसागर, शिवाजीराव पंडित, रमेश आडसकर, विमल मुंदडा, प्रकाश सोळंके, सुरेश धस, दरेकर नाना, टी. पी. मुंडे, दौंड, उषा दराडे, सय्यद सलील, शिराज देशमुख, जगताप, भारतभूषण क्षीरसागर आदींचा सहभाग होता. यातील अनेकजणांच्या घरातील व्यक्ती आजही पक्षात आहेत. तर काही जणांनी इतर पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत आहे. यामध्ये मराठवाड्याच्या वाट्याला राजेश टोपे, धनंजय मुंडे या दोघांना कॅबिनेट तर संजय बनसोडे यांना राज्यमंत्रिपद असे तीन मंत्रिपदे आलेली आहेत. 

पक्षाची चमकदार कामगिरी 
पक्षाची चमकदार कामगिरी आणि जनमताचा कौल पाहून भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला. पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना पक्षाला सामोरे जावे लागले. देशात आणि राज्यांच्या निरनिराळ्या भागांमध्ये पक्षाने आपले उमेदवार उभे केले. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्येही ‘राष्ट्रवादी’ राज्यांच्या सत्तेत सहभागी झाली. गोवा, नागालँड, मेघालय, मणिपूर, आसाम, गुजरात, केरळ, बिहार, ओरिसा, झारखंड, अरुणाचल या राज्यांमध्ये पक्षाला जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. 

लोकशाहीवर दृढ विश्‍वास 
स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही आणि विकास या संकल्पनांवर दृढ विश्वास ठेवून पक्ष अखंडित व प्रवाहीपणे आपले काम करीत आला आहे. विविध समाजघटकांना न्याय्य हक्क मिळावा यासाठी धोरणे आखून त्याच्या यशस्वी अंमलबजावणीचे काम पक्षाने समर्थपणे पार पाडले आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘युवा धोरण’ जाहीर करून त्यांना सर्व क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. रोजगार, निवारा, अन्न, शिक्षण, आरोग्याच्या अधिकाधिक उत्तम सुविधा देऊन देशातल्या सामान्य नागरिकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पक्षाने जाहीर केलेले आहे. धार्मिक, जातीय, सामाजिक, प्रादेशिक, लिंगाधारित किंवा सामाजिक स्थानावर आधारित कोणतेही भेद न करता कायद्याचे राज्य आणणे, हे या पक्षाचे ध्येय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT